द फोकस एक्सप्लेनर : भारताची जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा चांगली; जाणून घ्या जीडीपी म्हणजे काय? किती प्रकारचा असतो? जीडीपी मोजतात कसा?


केंद्र सरकारने 2021-22 च्या मार्च तिमाहीसह पूर्ण आर्थिक वर्षासाठीची (FY22) ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच GDPची आकडेवारी मंगळवारी जाहीर केली. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटेस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लीमेंटेशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च तिमाहीत GDP ग्रोथ 4.1% राहिली आहे. गतवर्षी याच कालावधीत ती 2.5% होती. पूर्ण वर्षात (FY22) GDP ग्रोथ 8.7% राहिली, जी FY21 मध्ये -6.6% होती.The Focus Explainer India’s GDP growth better than expected Know what is GDP? What kind How to calculate GDP

मार्च तिमाही में GVA ग्रोथ (YoY) 5.7% ने घटून 3.9% झाली. पूर्ण वर्षभरात म्हणजेच FY22 मध्ये GVA ग्रोथ 8.1% राहिली, जी वर्षभरापूर्वी म्हणजेच FY21 मध्ये 4.8% होती.आता पाहुया जीडीपी म्हणजे काय?

GDP हा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्वात सामान्य निर्देशकांपैकी एक आहे. GDP विशिष्ट कालावधीत देशामध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य दर्शवते. यामध्ये देशाच्या हद्दीत उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांचाही समावेश आहे. जेव्हा अर्थव्यवस्था निरोगी असते, तेव्हा बेरोजगारीची पातळी सामान्यतः कमी असते.

GDPचे प्रकार किती?

GDPचे दोन प्रकार आहेत. वास्तविक GDP आणि नाममात्र GDP. वास्तविक जीडीपीमध्ये, वस्तू आणि सेवांचे मूल्य मूळ वर्षाच्या मूल्यावर किंवा स्थिर किंमतीवर मोजले जाते. सध्या GDPची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष 2011-12 आहे. म्हणजेच 2011-12 मधील वस्तू आणि सेवांच्या दरांनुसार गणना. तर नाममात्र GDP वर्तमान किमतीवर मोजला जातो.

GDPची कसा मोजतात?

जीडीपी मोजण्यासाठी सूत्र वापरले जाते. GDP=C+G+I+NX, येथे C म्हणजे खासगी वापर, G म्हणजे सरकारी खर्च, I म्हणजे गुंतवणूक आणि NX म्हणजे निव्वळ निर्यात.

GVA म्हणजे काय?

ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड (GVA) अर्थव्यवस्थेच्या एकूण उत्पादन आणि उत्पन्नाचा संदर्भ देते. इनपुट खर्च आणि कच्च्या मालाची किंमत लक्षात घेऊन दिलेल्या कालावधीत किती रुपयांच्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले गेले ते ते सांगते. विशिष्ट क्षेत्र, उद्योग किंवा क्षेत्रामध्ये किती उत्पादन झाले आहे हेदेखील यावरून दिसून येते.

सोप्या भाषेत सांगायचे तर, GVA अर्थव्यवस्थेच्या एकूण आरोग्याविषयी सांगण्याव्यतिरिक्त हेदेखील सांगते की कोणती क्षेत्रे संघर्ष करत आहेत आणि कोणती रिकव्हरी आघाडीवर आहेत. राष्ट्रीय लेखांकनाच्या दृष्टिकोनातून, मॅक्रो स्तरावर GDP मध्ये सबसिडी आणि कर वजा केल्यावर मिळालेला आकडा म्हणजे GVA असतो.

The Focus Explainer India’s GDP growth better than expected Know what is GDP? What kind How to calculate GDP

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती