वृत्तसंस्था
सिंगापूर: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरने आंतरराष्ट्रीय प्रवासावर घातलेले निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे येत्या मंगळवारपासून भारतीय प्रवासी सहजपणे सिंगापूरला ये-जा करु शकणार आहेत. सिंगापूर हे बेट असल्याने त्यांनी बेटावरील कोरोनाची लागण रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले होते.Singapore removes India, 5 other South Asian nations from travel restriction list
शनिवारी सिंगापूरने घोेषणा केली की सिंगापूरात येण्यासाठी निर्बंध घातलेल्या देशांच्या यादीतून आम्ही भारत देशाचे नाव वगळत आहोत. भारतातील किमान चौदा दिवसांच्या मुक्कामाची नोंद असणारे प्रवासी सिंगापूरला जाऊ शकतील.
मात्र सिंगापूरात प्रवेश केल्यानंतर या प्रवाशांना तेथील कडक नियमांचे पालन करावे लागेल. यात त्यांना दहा दिवस घरातच मुक्काम करावा लागणार आहे. वर्चुअल पत्रकार परिषदेत सिंगापूर प्रशासनाने या संबंधीची माहिती दिली.
भारतातून आमच्या देशात येणाऱ्या प्रवाशांवर बंदी लादण्याचे आता कारण नाही असे सिंगापूरच्या प्रशासनाने स्पष्ट केले. सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, येत्या मंगळवारपासून हे नियम लागू होतील. दरम्यान, सिंगापूरातील आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 65 हजार 663 आहे. सिंगापूरच्या 294 कोरोना रुग्णांचा आजवर बळी गेलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App