सीबीएसईने मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करत कार्यक्षमतेवर आधारित प्रश्नांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईने मंडळाशी संलग्न शाळांना पाठवलेल्या पत्रात हे बदल सांगण्यात आले आहेत.Significant changes in CBSE exam assessment process, performance based questions 30%
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: सीबीएसईने मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करत कार्यक्षमतेवर आधारित प्रश्नांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईने मंडळाशी संलग्न शाळांना पाठवलेल्या पत्रात हे बदल सांगण्यात आले आहेत.
यानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्य आधारित प्रश्नांची संख्या जास्त असणार आहे. विस्तर उत्तरांची प्रश्नसंख्या कमी करण्यात आली आहे. सीबीएसईने मंडळाशी संलग्न शाळांना पाठवलेल्या पत्रात हे बदल सांगण्यात आले आहेत.
नवीन नियमांनुसार इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना कार्यक्षमतेवर आधारित हे किमान ३० टक्के असणार आहेत. हे प्रश्न प्रसंगावर आधारित अथवा बहुपयार्यी अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांना विचारता येऊ शकतात.
याचबरोबर २० टक्के प्रश्न हे बहुपयार्यी प्रश्न असतील, तर उर्वरित ५० टक्के प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा या प्रकारची असतील. तर इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करत असताना कार्यक्षमतेवर आधारित हे किमान २० टक्के असणार आहेत.
हे प्रश्न प्रसंगावर आधारित अथवा बहुपयार्यी अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांना विचारता येऊ शकतात. याचबरोबर २० टक्के प्रश्न हे बहुपयार्यी प्रश्न असतील, तर उर्वरित ४० टक्के प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा या प्रकारची असतील
दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App