Shyam Rajak : पक्ष प्रवेशाचा मुहूर्तही ठरला आहे, स्वत: ट्वीट करून दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
पाटणा : तब्बल चार वर्षांनंतर श्याम रजक पुन्हा एकदा जेडीयूमध्ये कमबॅक करणार आहेत. आज (रविवार) ते अधिकृतपणे जेडीयूचे सदस्यत्व स्वीकारतील. तत्पूर्वी, श्याम रजक म्हणाले होते की, राजदचा राजीनामा दिल्यानंतर ते राजकीय वाटचाल पुढे नेण्यासाठी पक्षाच्या शोधात आहेत. आता श्याम रजकाचा हा शोध जेडीयूकडे संपल्याचे स्पष्ट झाले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी श्याम रजक बिहारमध्ये उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी राजदमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राजदने त्यांना निवडणुकीत तिकीट दिले नाही आणि त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवले. Shyam Rajak
Adani-Group : अदानी-ग्रुपची धारावी प्रकल्पात ₹2,000 कोटींची गुंतवणूक; 2 महिन्यांत बांधकाम सुरू होणे अपेक्षित
या चार वर्षांनंतर श्याम रजक यांनी गेल्या आठवड्यात अचानक राजदच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.राजीनामा सादर करताना श्याम रजक यांनी लालूप्रसाद यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
‘मैं शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया। आप मोहरे चल रहे थे, मैं रिश्तेदारी निभा रहा था।’ असं म्हणत श्याम रजक यांनी लालूंवर टीका केली होती. Shyam Rajak
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more