राजनाथ सिंह यांचे वक्तव्य, काँग्रेसवर सोडले टीकास्त्र!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केरळमधील तिरुअनंतपुरम येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर महिलांना या देशाच्या विकासात सक्रिय योगदान देण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते, परंतु आता परिस्थिती वेगाने बदलत आहे.
संरक्षणमंत्र्यांनी सशस्त्र दलात महिलांच्या वाढलेल्या सहभागाचे उदाहरण दिले. राजनाथ सिंह म्हणाले, ‘मी गृहमंत्री असताना सर्व राज्यांना त्यांच्या राज्यातील सुरक्षा दलातील एक तृतीयांश जागा महिला उमेदवारांनी भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज सर्व पोलीस दल आणि निमलष्करी दलात महिलांचा सहभाग वाढला आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, ‘सशस्त्र दलात महिलांच्या प्रवेशातील अनेक अडथळे दूर झाले आहेत. सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. महिलांनाही सैनिक शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. महिलांसाठी नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीही उघडण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील हजारो तरुणी एनडीएच्या प्रवेश परीक्षेत सहभागी होतात.
मुस्लीम समुदायाबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, ‘तिहेरी तलाकची प्रथा ही आपल्या मुस्लिम बहिणी आणि मुलींसाठी एक मोठी समस्या होती. तिहेरी तलाक सांगून लग्नासारखी पवित्र संस्था संपवणे हे अजिबात समर्थनीय ठरू शकत नाही, पण ही प्रथा आपल्या देशात कोणत्याही बंधनाशिवाय सुरू होती. आमच्या सरकारने ही वाईट प्रथा संपवण्याची इच्छाशक्ती दाखवली. मुस्लिम महिलांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more