वृत्तसंस्था
कोची : देशात काँग्रेसचा मोदी द्वेष एवढा टोकाला पोहोचला आहे, की त्यातून आपण देशहिता विरोधातच भूमिका घेत असल्याचे भान काँग्रेसच्या नेत्यांना उरत नाही. याचे प्रत्यंतर केरळमध्ये आले. भारताचे इस्रायलशी उत्तम संबंध आहेत. परराष्ट्र धोरण हे पक्षीय भेदांच्या पलीकडचे असते हे विसरून जाऊन केरळ मधल्या काँग्रेस खासदाराने इस्रायली पंतप्रधानांना गोळीने उडवण्याची उन्मत्त भाषा केली आहे.Shoot the Prime Minister of Israel; Frantic statement of Congress MP at Hamas support rally in Kerala
इस्रायलने गाझा पट्टीत हमास दहशतवाद्यांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. त्या विरोधात केरळ मधले युनायटेड मुस्लिम संघटनेने आयोजित केलेल्या हमास समर्थन रॅलीत यासंदर्भात काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी उन्मत्त वक्तव्य केले. हमास विरुद्ध युद्धासाठी इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू हेच जबाबदार आहेत. त्यांना सरळ गोळी घालून उडवा. त्यांच्या विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करत बसू नका. नेत्यान्याहू यांना गोळ्या घाला, ते म्हणाले.
गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्याकडून सुरू असलेल्या जमिनीवरील हल्ल्यादरम्यान पॅलेस्टाईनशी एकता दाखवण्यासाठी, केरळमधील कासारगोड येथे आयोजित सभेला संबोधित करताना काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन यांनी हे उन्मत्त वक्तव्य केले.
खासदार उन्नीथन म्हणाले, की ज्यांनी जिनिव्हा करारांतर्गत सर्व करार मोडले त्यांचे काय केले पाहिजे?? दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध गुन्ह्यातील दोषींना (नाझी) न्याय मिळवून देण्यासाठी न्युरेमबर्ग ट्रायल नावाची गोष्ट होती. खटला न चालवता गुन्ह्यांची अंमलबजावणी केली जात होती. आता वेळ आली आहे की, इस्रायलच्या पंतप्रधानांविरुद्ध न्युरेमबर्ग मॉडेल लागू केले गेले पाहिजे.आज बेंजामिन नेतान्याहू हे युद्ध गुन्हेगार म्हणून जगासमोर उभे आहेत.आता नेतन्याहू यांना गोळ्या घालून ठार मारण्याची वेळ आली आहे.
कासारगोड युनायटेड मुस्लीम संघटनांकडून शुक्रवारी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस खासदाराच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, खासदाराच्या अशा वक्तव्यांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. काँग्रेस पक्षाची आपल्या खासदाराच्या अशा विधानांवर काय भूमिका आहे हे मला माहिती नाही. संसद सदस्य हे एक अतिशय जबाबदार पद आहे, ज्याकडे आंतरराष्ट्रीय समुदाय लक्ष देतो. एखादा खासदार अशी विधाने करतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
यावर केरळ भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन म्हणाले, काँग्रेस कोणत्या दिशेने जात आहे?? आपण एका आंतरराष्ट्रीय गुन्ह्याला प्रोत्साहन देतात तिथून देत आहोत याचे भानही काँग्रेस खासदाराला राहिले नाही काँग्रेसचे नेते अशी उन्मत्त वक्तव्ये करून स्वतःच्याच पक्षाला खड्ड्यात घालत आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App