सोलापुरात संजय राऊतांच्या कारवर चप्पलफेक; अज्ञातांकडून ‘नारायण राणे जिंदाबाद’च्या घोषणा


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : सोलापुरात एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी गेलेले ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या कारवर चप्पलफेक करण्यात आली. त्यानंतर घटनास्थळावर चांगलाच गोंधळ उडाला. अज्ञातांनी ही चप्पलफेक केल्यानंतर ‘नारायण राणे जिंदाबाद’ अशा घोषणा देत घटनास्थळावरून पळ काढला.Shoes thrown at Sanjay Raut’s car in Solapur; Announcements of ‘Narayan Rane Zindabad’ by unknown people

संजय राऊत हे सोलापूर दौऱ्यावर होते. काल दिवसभर त्यांनी सोलापुरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. शिवसैनिकांशी संवाद साधला. मीडियाशीही संवाद साधला. संध्याकाळी त्यांचा मुख्य आणि महत्त्वाचा कार्यक्रम होता. राऊत यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन करण्यात येणार होतं. त्यामुळे राऊत थांबले होते. संध्याकाळी ते कार्यक्रम स्थळी आले. राऊत यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटनही करण्यात आलं. त्यानंतर राऊत यांचे भाषणही झाले.या कार्यक्रमाला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी होती. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम आटोपून संजय राऊत निघाले होते. राऊत बाहेर पडले. गाडीत बसले. त्यांची गाडी काही अंतरावर गेली. गर्दी असल्याने गाडीचा स्पीड कमी होता. इतक्यात गाडीच्या टपावर काही तरी वाजल्याचा आवाज झाला अन् सर्वच अलर्ट झाले.

गाडीच्या टपावर एक पिशवी पडली होती. या पिशवीत पाच ते सहा चपलांचे जोड होते. राऊत यांच्या दिशेने या चपला भिरकावण्यात आल्या होत्या. चप्पल भिरकावल्यानंतर नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा देत एक तरुण गर्दीतून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहे. संजय राऊत हे सुखरुप आहेत. त्यांना काहीही झालं नसल्याचं सांगण्यात आलं.

सुषमा अंधारे यांचा ताफा अडवला

दरम्यान, संध्याकाळी नाशिक मधील मनमाड मध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचाही ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मराठा कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अंधारे यांचा ताफा पोलिसांनी व्यवस्थित काढून पुढे नेला.

Shoes thrown at Sanjay Raut’s car in Solapur; Announcements of ‘Narayan Rane Zindabad’ by unknown people

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*