विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : यवतमाळ येथील एक हिंदू युवक धर्मांतरासाठी अर्थसहाय्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ येथे राहणाऱ्या युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे शुक्रवारी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून धर्मांतराशी निगडीत टोळीतील सदस्य यवतमाळ जिल्ह्यात आढळले.Shocking, Hindu youth financing conversion, Yavatmal youth arrested in Kanpur, Uttar Pradesh
पुसद येथून लखनऊ एटीएसने डॉ. फराज शहा याला अटक केली त्यातूनच यवतमाळच्या युवकाची माहिती मिळाली.धीरज गोविंद जगताप (देशमुख) (३८) असे लखनऊ एटीएसने अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. तो पुसद शहरातील वसंत नगर भागात राहणारा डॉक्टर फराज शहा सोबत धर्मांतराचे काम करत होता.
डॉ. फराज याला लखनऊ एटीएसने दीड महिन्यापूर्वी पुसद शहरातून अटक केली. त्यानंतर धर्मांतरासाठी काम करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला. यवतमाळ शहरातील धीरज जगताप या युवकाला कानपूर मध्ये अटक झाली. धीरज यवतमाळ मध्ये कंत्राटदार म्हणून काम करत होता.
मात्र काही दिवसानंतर धर्मांतर करून तो घराबाहेर पडला. तो घरी फिरकत नसल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन निघून गेली. धीरज हा धर्मांतराच्या प्रकियेत अर्थ सहाय्य करत असल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App