एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे खरी राजकीय खेळी उद्धव ठाकरेंची. खरी राजकीय खेळी शरद पवारांची. त्यामध्ये उपखेळी अजित पवारांची.. वगैरे विश्लेषणांचा रतीब मराठी माध्यमे घालत आहेत. त्यात मराठी माध्यमांची गेल्या 2.5 वर्षातली “पवार बुद्धी” जोरदार कामाला लागली आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागच्या “पॉवरफुल” खेळीची पल्लेदार वर्णने वेगवेगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांवर आणि कट्ट्यांवर जोरदार सुरू आहेत!! पण खऱ्या अर्थाने पडद्यामागच्या हालचाली कोणालाच टिपता आलेल्या नाहीत. मराठी माध्यमांची झेप “पवार बुद्धीच्या” आणि काँग्रेसी रिपोर्टिंग स्टाइलच्या पलिकडे गेली नसल्याचे हे घडत आहे. Shivsena splits : modi, shah, nadda pledges end of regional Dynasty politics of Thackeray and Pawar
– मोदी, शहा, नड्डा त्रिकुटाकडे दुर्लक्ष
मराठी माध्यमांच्या हे लक्षातच येत नाही की एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागचे राजकीय इंगित नेमके काय आहे?? यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे गेल्या दीड वर्षांपासून जाहीर भाषणांमध्ये जे सांगत आहेत, त्याकडे मराठी माध्यमांनी दुर्लक्ष दुर्लक्ष करणे हे विश्लेषण सुकण्यासाठी जबाबदार आहे!!
– प्रादेशिक घराणेशाहीचा बिमोड हेच ध्येय
वर उल्लेख केलेले तीनही नेते गेल्या दीड वर्षांपासून आपल्या प्रत्येक जाहीर भाषणांमध्ये प्रादेशिक घराणेशाहीचा अजून उल्लेख करत आहेत. केंद्रीय पातळीवर काँग्रेसच्या घराणेशाहीला टार्गेट करून ही घराणेशाही राजकीय दृष्ट्या जवळजवळ संपुष्टात आणल्यानंतर भाजपच्या या अतिवरिष्ठ त्रिकुटाने आपले सर्व लक्ष प्रादेशिक घराणेशाहीवर केंद्रित केले आहे आणि हे करताना त्यांनी प्रादेशिक घराण्यांमध्ये निवडक घराणी सुरुवातीला टार्गेटवर घेतली आहेत. हे एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागचे खरे राजकीय इंगित आहे!!
– पडद्याआड नव्हे, तर उघडपणे
बरं हे सगळे करताना भाजपचा त्रिकुटाने कुठेही काहीही पडद्याआड केलेले नाही. हे सर्व मोदी शहा आणि नड्डा जाहीररित्या बोललेले आहेत. तरी देखील राठी माध्यमे त्यातल्या गंभीर राजकीय इशार्याकडे दुर्लक्ष करून एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे स्वतः उद्धव ठाकरेच कसे आहेत, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून एक्झिट प्लॅन बनवून एकनाथ शिंदे यांना भाजपकडे पाठवले आहे, शरद पवारांना शिवसेना मोडायची आहे म्हणून एकनाथ शिंदे यांचे बंड झाले आहे, अजित पवारांना हे बंड हवेच आहे अशा वेगवेगळ्या कन्स्पिरॅसी थिअरीज मांडत आहेत.
– ठाकरे यांच्या घराणेशाहीला खणती
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे प्रादेशिक पातळीवरचे घराणेशाहीचे नेते आहेत हे कोणी लक्षातच घेत नाही आणि लक्षात घेतले तर त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे विश्लेषण करत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सुरवातीला खणती लागली आहे, ती ठाकर्यांच्या घराणेशाहीला!! ठाकरे यांची घराणेशाही शिवसेनेतच उद्ध्वस्त होण्याची पाळी आली आहे आणि जर ती घराणेशाही शिवसेनेत टिकूनच राहणार असेल तर घराणेशाहीची शिवसेना दुबळी होईल याची व्यवस्था करण्यात आली आहे.
– पवारांची तरी घराणेशाही कशी टिकेल??
ठाकरेंची दुबळी झालेली घराणेशाही देखील टिकवण्यासाठी पवारांची घराणेशाही सध्या जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. ठाकरे घराणे शाही उध्वस्त झाली की शिवसेनेतली थोडीफार राजकीय स्पेस आपल्याला मिळेल अशी आशा पवारांच्या घराणेशाहीला जरूर आहे ती काही काळासाठी तशी कदाचित मिळेल ही पण पण ठाकरेंची घराणेशाही उध्वस्त झाल्यावर पवारांची तरी घराणेशाही दीर्घकाळ कशी टिकून राहील??, हा मूलभूत प्रश्न आहे… प्रश्न आत्ता की नंतर एवढाच मर्यादित आहे!!
– अजितदादांचे बंड वेगळे, शिंदेंचे वेगळे!!
अजित पवारांचे 2019 चे बंड, सकाळचा शपथविधी आणि एकनाथ शिंदे यांचे 2022 मधले बंड आणि अजून व्हायचा शपथविधी यात मूलभूत फरक आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस राजकीयदृष्ट्या चकले. अजित पवारांवर अतिरिक्त विश्वास ठेवल्याने त्यांची फसगत झाली. शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून त्यावेळी महाविकास आघाडी सरकार बनवले. पण हे करताना ठाकरे आणि पवार यांनी स्वतःची घराणेशाही मजबूत केली ही वस्तुस्थिती भाजप नेतृत्व कसे दृष्टीआड करेल?? आणि ही प्रादेशिक घराणेशाही इथून पुढच्या काळात मोडून काढल्याशिवाय 2024 मध्ये भाजपला अपेक्षित असणारे यश तरी कसे मिळेल?? हे लक्षात घेऊनच प्रादेशिक घराणेशाहीचा बिमोड करण्याचा चंग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बांधला आहे. मग ती घराणेशाही कोणत्या राजकीय मार्गाने मोडायची याचे सगळे मार्ग भाजपचे केंद्रीय नेतृत्व अवलंबणार हे उघड आहे. मग तो मार्ग सुरत मधून गुहावटीला जाओ किंवा इंदूर मधून बडोद्याला येवो!! प्रादेशिक घराणेशाही मोडणे ही यातली राजकीय वस्तुस्थिती आहे!!
– 2024 टार्गेट 400
यामध्ये नजीकच्या काळातली निवडणूक महाराष्ट्रातली मध्यावधी निवडणूक वगैरे विश्लेषणे आणि त्याचा रतीब मराठी माध्यमे कितीही घालत असली तरी 2024 च्या निवडणुकीतले भाजपचे 400 जागांचे टार्गेट हीच यातली राजकिय वस्तुस्थिती आहे आणि हे टार्गेट गाठायचे असेल तर केंद्रीय पातळीवरची काँग्रेसची घराणेशाही आणि प्रादेशिक पातळीवरची घराणेशाही पूर्णपणे मोडून काढण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊनच महाराष्ट्रातल्या घडामोडी मध्ये भाजप संथपणे आणि दमदारपणे पावले टाकताना दिसत आहे!!… पवार बुद्धीच्या मराठी माध्यमांना ती दिसत नाहीत एवढेच!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App