विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kiran Pavaskar विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणामधील लोकांवर दिली असून येथून शेकडो कोटी रुपये महाराष्ट्रात येतील, अशी खळबळजनक माहिती शिवसेना सचिव व मुख्य प्रवक्ते किरण पावसकर यांनी दिली. या दोन्ही राज्यांच्या बॉर्डर सील करण्यासाठी निवडणूक आयोगाला निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Kiran Pavaskar
पावसकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुकीत पैशांचा खेळ होईल. महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातून नव्हे तर परदेशातूनही पैसा येत आहे. या पैशांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत याच दोन राज्यांतून महाराष्ट्रात पैसा आला होता. याचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करण्याची गरज आहे, असे पावसकर म्हणाले. कुठेतरी छोटी रक्कम पकडल्याचे दाखवायचे आणि मोठे घबाड यांच्याच घरी पाठवायचे असा प्रकार सुरु आहे, असे ते म्हणाले.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता सोडणारे उबाठा किमान नातं तरी जपतील पण अमित ठाकरेंविरोधात माहिम उमेदवार जाहीर करुन उबाठाने नातं देखील जपले नाही, अशी घणाघाती टीका पावसकर यांनी केली. मी आणि माझ कुंटुंब बाकी सगळे गेले तेल लावत, अशी उबाठाचा थाट असल्याची टीका त्यांनी केली. मात्र राहुल गांधी आणि सोनिया गांधी मागील आठ दिवस उबाठाला वेळ देत नसल्याने त्यांची जागा वाटपाबाबत कोंडी झाली आहे.
पावसकर पुढे म्हणाले की राज ठाकरे यांनी आपले विचार सडेतोड मांडले. त्यांनी कधी राजकारणाचा, खुर्चीचा, पैशांचा विचार केला नाही. मागच्या निवडणुकीत पुतण्यासाठी वरळीत उमेदवार न देऊन राज ठाकरे यांनी नातं जपलं. मात्र त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीत उभे राहिले म्हणून त्याची परतफेड करण्याचे साधं सौजन्य उबाठाच्या प्रमुखामध्ये राहू नये ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका पावसकर यांनी केली. नातं जपलं गेले नाही, नातेवाईक आणि भावांना जपले गेले नाही, मराठी माणसाला जपले गेले नाही आणि बाळासाहेबांच्या विचारांनाही उबाठाकडून जपले गेले नाही. कशाचीही फिकीर न करता फक्त खुर्ची आणि खुर्ची आणि मी मुंख्यमंत्री कसा होईन आणि माझा मुलगा मंत्री कसा होईल. मी आणि माझं कुटुंब बाकी सगळे गेले तेल लावत हा एकच प्रकार उबाठाकडून सुरू असल्याची खरमरीत टीका पावसकर यांनी केली.
माहिम विधानसभेत सदा सरवणकर यांनी आमदार म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या भागात त्यांचा प्रभाव आहे. सिद्धीविनायक मंदीर न्यासाचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत मैत्रिपूर्ण नव्हे तर लढत म्हणूनच होईल, असे पावसकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मतदान करा पुढेही असेच काम सुरु राहील, असे म्हटले आहे. ज्यांनी 15000 कोटी कमावयचे असतील त्यांना 1500 रुपयांचे काय मोल कळणार. पत्राचाळीत 100 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना 1500 रुपयांचे महत्व नाही कळणार अशी टीका पावसकर यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App