विशेष प्रतिनिधी
मुंबई : sharad pawar तोंडी नास्तिकाची पुरोगामी भाषा, पण मंत्र पठाणाद्वारे पूजाअर्चा करा आणि कसाही करून गुरुपुष्यामृताचा मुहूर्त गाठा!! अशीच अवस्था शरद पवारांच्या ( sharad pawar ) राष्ट्रवादी काँग्रेसची आज झाली. पवारांच्या राष्ट्रवादीने गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये युगेंद्र पवार यांचा बारामतीतून समावेश आहे.sharad pawar
एरवी पुरोगामीत्वाच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घरी पूजाअर्चा करून उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये जितेंद्र आव्हाड आघाडीवर होते. त्यांनी घरी पूजाअर्चा केली. त्यावेळी शरद पवार तिथे उपस्थित होते. पुरोहित मंत्र पठण करत असताना जितेंद्र आव्हाडांनी शरद पवार यांच्या हस्ते उमेदवारी अर्ज स्वीकारला आणि त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर ते मिरवणुकीद्वारे अर्ज भरायला गेले. या मिरवणुकीत थोडा वेळ शरद पवार सामील झाले.
शरद पवारांनी बहुतेक उमेदवारांना आधीच एबी फॉर्म देऊन ठेवलेत. परंतु, गुरुपुष्यामृताचा मुहूर्त चुकू नये यासाठी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची पहिली उमेदवारी यादी आज सायंकाळी जाहीर केली. यामध्ये त्यांचे स्वतःचे नाव इस्लामपुरातून तर आहेच, पण त्याचबरोबर काटोल मधून अनिल देशमुख, मुंब्रा कळव्यातून जितेंद्र आव्हाड, घनसावंगीतून राजेश टोपे, कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील या खात्रीच्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. याखेरीज अन्य 40 उमेदवारांचाही यादीमध्ये समावेश आहे. बलात्काराचा आरोप असणारा राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष महबूब शेखला आष्टीतून उमेदवारी जाहीर झाली आहे.
अपेक्षेप्रमाणे हर्षवर्धन पाटील, राजेंद्र शिंगणे, संदीप नाईक, भाग्यश्री आत्राम, चरण वाघमारे, बापू पठारे, महेश कोठे या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना पवारांनी उमेदवारी बहाल केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App