विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने ( Shikhar Dhawan )आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याने ही माहिती दिली. 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर होता.
निवृत्तीचा व्हिडिओ पोस्ट करत शिखरने लिहिले – मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत आहे, मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जात आहे. प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद! जय हिंद…
शिखरने 2010 मध्ये पदार्पण केले
शिखरने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर कसोटीमध्ये त्याला 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. शिखरने आतापर्यंत खेळलेल्या 34 कसोटींमध्ये 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या आहेत. तर 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.11 च्या सरासरीने 7436 धावा केल्या. त्याच वेळी, 68 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 27.92 च्या सरासरीने 1759 धावा केल्या आहेत.
धवन 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला होता
शिखर आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना दिसला होता, पण दुखापतीमुळे तो अनेक सामने खेळू शकला नाही. शिखर आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसू शकतो कारण त्याने त्याच्या आयपीएलमधून निवृत्तीबाबत व्हिडिओमध्ये काहीही सांगितलेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App