विशेष प्रतिनिधी
जालना : भंगार वितळवणाऱ्या भट्टीत झालेल्या स्फोटात लोखंडाचे १४०० अंश सेल्सियस उष्ण पाणी अंगावर पडल्याने ३४ कामगार भाजले. जालन्याच्या ( Jalna ) गजकेसरी सळई कारखान्यात शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. जखमींपैकी ७ जणांवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुगणालयात तर १२ जणांवर जालना शहरात उपचार सुरू अाहेत. किरकोळ जखमी झालेल्या १५ जणांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले.
अपघाताचे कारण शोधण्यासाठी औद्योगिक सुरक्षा विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. गजकेसरी कारखान्यात भंगार वितळवण्याचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात भट्टीतील १४०० अंश सेल्सियसचे पाणी शेजारील दुसरी भट्टी दुरुस्त करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे जवळपास ४० कामगार काम करत होते.
घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने सर्व जखमींना खासगी रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी जखमी कामगार आणि त्यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन दुर्घटनेचा तपशील जाणून घेतला. छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारखान्यात येऊन तपासणी केली. खासदार डॉ.कल्याण काळे, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनीही कारखान्यात आणि रुग्णालयात पाहणी केली.
जालना येथील गजकेसरी या कारखान्यात शनिवारीतिसऱ्या भट्टीत लोखंडी भंगार वितळण्याचे काम सुरूहोते. या तिन्ही भट्ट्या शेजारीच आहेत. त्यापैकी १२.३०वाजेच्या सुमारास लोखंड वितळण्याचे काम सुरुअसलेल्या भट्टीत स्फोट झाला. त्यामुळे या भट्टीतीलवितळलेले लोखंडाचे पाणी शेजारीच भट्टी दुरुस्तीचेकाम करीत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडले.त्यामुळे भाजल्याने ३४ कामगार जखमी झाले.वितळलेल्या लोखंडाच्या पाण्यात ऑईल किंवा ग्रीसमिश्रीत वस्तू पडल्याने घटना घडलेली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App