ठाण्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांवर पत्र्याचे शेड कोसळले; आठजण गंभीर जखमी!

आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने जखमींना मदतीचे आश्वासन दिले आहे.


विशेष प्रतिनिधी

ठाणे : मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे लोकांचे हाल झाले आहेत. वादळामुळे अनेक दुर्घटनाही घडत आहेत. असेच एक प्रकरण ठाण्यातून समोर आले आहे. पाऊस आणि वादळामुळे ठाण्यातील उपवन येथील गव्हाणबाग परिसरात एका इमारतीचे पत्र्याचे शेड उन्मळून फुटबॉल मैदानावर कोसळले. या ठिकाणी काही मुले खेळत होती. सोसाट्याच्या वाऱ्याने उडून आलेले पत्र्याचे शेड त्या मुलांवर पडले. या अपघातात 7-8 मुले गंभीर जखमी झाली आहेत. सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास मुले फुटबॉल खेळत असताना ही दुर्घटना झाली.Sheet shed falls on boys playing football in Thane Eight seriously injured



या दुर्घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक मोठा पत्रा खाली पडताना दिसत आहे. त्याखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी आजूबाजूचे इतर खेळाडू ताबडतोब तिकडे धावले आणि दबलेल्या मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय तेथे काही मुले जखमी अवस्थेत पडलेली दिसत आहेत.

मुसळधार पावसात मुले फुटबॉल खेळत असताना अचानक समोरील इमारतीच्या छताचा पत्र्याचे शेड उडून मैदानात खेळणाऱ्या मुलांवर पडले. या घटनेनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने जखमींना मदतीचे आश्वासन दिले आहे. प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. जखमींमध्ये अनेक मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सर्व मुले इयत्ता 9वी आणि 10वीचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sheet shed falls on boys playing football in Thane Eight seriously injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात