OBC Reservation : शिंदे – फडणवीस सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवून अखेर लक्ष्मण हाकेंचे उपोषण मागे!!


विशेष प्रतिनिधी

जालना : OBC आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी 10 दिवसांपासून प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले होते. शिंदे – फडणवीस सरकारच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांनी ते उपोषण आज मागे घेतले. Laxman Hake End His Indefinite Hunger Strike After Drinking Juice Successful Discussion

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने जालन्यात वडीगोद्री येथे आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाला आलेल्या आजीच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारच्या शिष्टमंडळाने पटवून दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. सरकारच्या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह १२ जणांचा समावेश होता. आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाल्यानंतर एअर पोर्ट्वरच शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यानंतर ते जालन्यात वडगोद्रीच्या दिशेने रवाना झाले. ‘आम्ही आंदोलन थांबवलेलं नाही. आंदोलन स्थगित करत आहोत’ असं लक्ष्मण हाके म्हणाले.

आपले आंदोलन 10 दिवसांपासून सुरू आहे. मान्यवर मंडळी आणि शासनाचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. एकदोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यावर सरकाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासनाचं शिष्टमंडळाला विनंती आहे. गेल्या तीन वर्षापासून पंचायत राजमधील आरक्षण पेंडिग आहे. आमची 56 हजार गावे वंचित आहे. 1000 पंचायत सदस्य भेटून गेले आहेत. शासनाने कोर्टात काही विनंती केली पाहिजे. हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत. सरकारला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. याचा अर्थ आम्हाला कळत नाही. त्याला डावललं जात आहे हे समजू नये. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. आताचं आंदोलन स्थगित करत आहोत” असं लक्ष्मण हाके म्हणाले.

OBC आरक्षणाला धक्का लागेल ही भीती

मराठ्यांना कुणबी ठरवून OBC मधून आरक्षण द्याव ही मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. सग्या-सोयऱ्यांनाही आरक्षण द्यावे ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. पण यामुळे OBC आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. त्यासाठीच लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस होता. त्यांची प्रकृती ढासळत चालली होती.

सरकारचं शिष्टमंडळात कोण-कोण?

सरकारच्या शिष्टमंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे 5 मंत्री, आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते सुद्धा होते. जालना वडीगोद्रीत ओबीसी समाजाची मोठी गर्दी झाली आहे. उपोषणस्थळी ओबीसी समाजाची मोठी गर्दी झाली होती.

Laxman Hake End His Indefinite Hunger Strike After Drinking Juice Successful Discussion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात