विनायक ढेरे
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्यासमोर शशी थरूर आव्हान निर्माण करणार का??, की अन्य कोणी नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार??, असे सवाल करणाऱ्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. स्वतः शशी थरूर यांनी आज 30 ऑगस्ट 2022 रोजी केरळ मधील दैनिक “मातृभूमी” मध्ये एक लेख लिहून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक नि:पक्षपाती आणि मोकळ्या वातावरणात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Shashi Tharoor’s jump in Congress president election
या लेखावरूनच शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या अटकळी प्रसार माध्यमांनी बांधल्या आहेत. या मुद्द्यावर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना शशी थरूर यांनी अधिक कुठलीही कमेंट करण्यास नकार दिला आहे. मला जे म्हणायचे आहे ते मी “मातृभूमी”मधील लेखात म्हटले आहे. त्यापेक्षा मी सध्या तरी काहीही अधिक बोलू इच्छित नाही असे थरूर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रचंड खदखद
काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्येच प्रचंड खदखद आहे. गांधीनिष्ठ गट वगळला तर जी 23 गट आणि सर्वसामान्य कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. राहुल गांधी अध्यक्ष होणार की नाही?? ते निवडून आले तरी ते अध्यक्षपद स्वीकारतील की नाही?? याविषयी शंका व्यक्त होत आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षपदाच्या रिंगणात काँग्रेसचे अमृतसरचे खासदार मनीष तिवारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे देखील चर्चेत आहेत. या दोघांनीही आपापल्या नावांना दुजोरा दिलेल्या नाही. पण राहुल गांधी आपल्या आधीच्या प्रतिज्ञावर ठाम राहिले आणि त्यांनी निवडून आल्यानंतरही काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले नाही तर नेमके काय करायचे?? या विषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे.
अशोक गेहलोत यांचे नाव रिंगणात
शशी थरूर, मनीष तिवारी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या आधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्ष पदासाठी सर्वात आघाडीच्या चर्चेत आहे. अर्थात ते आहे गांधी परिवार निष्ठ उमेदवार असल्याने त्यांना बिनविरोध निवडून येण्याची शक्यता नाही. शशी थरूर यांनी “मातृभूमी” मधील लेखात नेमका हाच मुद्दा अधोरेखित केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी परिवारातील कोणीही नेता नकोच पण तो फक्त गांधीनिष्ठही नको तर पूर्णपणे काँग्रेसनिष्ठा हवा ही यामागची भूमिका असल्याचे दिसून येत आहे. शशी थरूर यांनी आपल्या लेखात जी 23 गटाच्या नेत्यांची भूमिका सौम्य भाषेत पुढे ओढली आहे. एक प्रकारे शशी थरूर यांच्या रूपाने जी 23 गटाला आणखी एक नेता मिळून हा गट जी 24 नावाने ओळखला जाणार का??, हा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे.
कंपाउंडरचे उपचार
जी 23 नेत्यांच्या गांधी परिवाराविषयी विशेष राहुल गांधींविषयी ज्या तक्रारी आहेत त्या प्रामुख्याने संघटनात्मक पातळीवरच्या आहेत आणि त्यामध्ये तथ्य जरूर आहे. पण या तक्रारी दूर करण्याची नेमकी क्षमता कोणाकडे आहे??, याचा स्पष्ट खुलासा ना गांधी परिवार करतो आहे, ना जी 23 गटाचे नेते!! खरी अडचण तिथे आहे. काँग्रेस मधून बाहेर पडलेले नेते गुलाम नबी आझाद कालच म्हणालेत, काँग्रेसला जालीम औषधाची गरज आहे. म्हणजे मोठ्या डॉक्टरच्या उपायाची गरज आहे. पण उपचार मात्र कंपाउंडर कडून सुरू आहेत. काँग्रेस बाहेर जाऊन गुलाम नबी आझाद यांनी हे वक्तव्य केले आहे. पण काँग्रेसमध्ये राहून त्यांना स्वतःला देखील डॉक्टर होऊन काँग्रेसच्या दुखण्यावर उपाययोजना करता आलेली नव्हती, ही वस्तुस्थिती आहे.
यातून एक निश्चित ते म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही होवो, अगदी राहुल गांधी होवोत, वाटचाल सोपी नाही. तर ती अधिक खडतर आहे, हेच दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App