आषाढी वारीत शरद पवार पायी चालणार नाहीत!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत पायी चालत सहभागी होणार, अशा बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या. त्या खुद्द शरद पवारांनी आज खोडून काढल्या.Sharad Pawar will not walk in Ashadhi Wari!!

शरद पवार 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत चालणार अशा बातम्यांमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. पण पुण्यातल्या पत्रकार परिषदेत
शरद पवार म्हणाले, मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे. पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या  स्वागतासाठी मी थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही, तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे.



भारतीय टीमचा अद्भुत चमत्कार

टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयावर शरद पवार म्हणाले, एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केलं.  टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला.  सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसपीत बुमराह आणि कुलदीप यादव चांगली कामगिरी केली. द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले. भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

अर्थसंकल्पावर शरद पवार म्हणाले….

शरद पवारांनी अर्थसंकल्पावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले,  महाराष्ट्र हे दोन नंबरचे कर्जबाजारी राज्य आहे. तुमच्याकडे खिशात काय? हे न तपासता तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करायला गेलात तर काय अवस्था होते हे मी सांगायची गरज नाही. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धसका घेतला आहे आणि म्हणून अशाप्रकारची आखणी केली आहे. ठीक आहे, आखणी केली. तातडीने या सगळ्या गोष्टी आम्ही देणार असं जाहीर केलं. आता दिवस फार राहिले नाहीत. आता थोड्याच दिवसात वस्तुस्थिती कळेल, आम्ही त्याची वाट बघतोय.

Sharad Pawar will not walk in Ashadhi Wari!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात