विशेष प्रतिनिधी
लखनौ : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी पहिल्या दोन क्रमांकावर तर सोडाच, पण तिसऱ्या क्रमांकावर ढकलले जाऊन लोकसभेच्या डबल डिजिट जागा लढवायची लढवायला मिळण्याची महाराष्ट्र लिमिटेड चाणक्यांची मारामार, पण तिकडे उत्तर प्रदेशात विनोद तावडेंच्या नेतृत्वात 80 जागांचा रोडमॅप तयार!! असे घडते आहे.Sharad pawar is struggle for double digit constituencies in maharashtra, vinod tawde planning for 80 seats in UP
लखनऊच्या चान्सलर क्लब मध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर प्रदेश भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशातले झाडून सगळे मंत्री आणि वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. विनोद तावडे यांचे या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून मुख्य मार्गदर्शन होत आहे.
भाजपने ज्यावेळी अबकी बार 400 पार ही घोषणा दिली, त्यावेळी उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी 70 जागा जिंकून आणण्याचा निर्णय घेतला निर्धार केला. हा निर्धार पार पाडण्यासाठीच विनोद तावडे यांच्या उपस्थितीत ही दिवसभराची बैठक होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश कुमार पाठक, प्रदेशाध्यक्ष भूपेंद्रसिंह, मंत्री स्वतंत्र देव सिंह सुरेश खन्ना, सूर्यप्रताप शाही आदी बडे नेते हजर आहेत.
#WATCH लखनऊ: उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने लोकसभा चुनाव 2024 को लेकर आयोजित प्रदेश BJP की बैठक में हिस्सा लिया। pic.twitter.com/25onm3lRv1 — ANI_HindiNews (@AHindinews) January 11, 2024
#WATCH लखनऊ: उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने लोकसभा चुनाव 2024 को लेकर आयोजित प्रदेश BJP की बैठक में हिस्सा लिया। pic.twitter.com/25onm3lRv1
— ANI_HindiNews (@AHindinews) January 11, 2024
या बैठकीत उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी प्रत्येक जागांचा प्रचाराचा रणनीतीचा आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. उत्तर प्रदेशातील बूथनिहाय बांधणी भाजपने आधीच पूर्ण केली आहे. जिथे भाजप कमजोर आहे, तिथे रणनीती बदल करून कोणत्या प्रकारे भाजपला मजबूत स्थितीत आणता येईल याचा विचार विनिमय बैठकीत सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक वरिष्ठ, दुसऱ्या फळीतल्या, तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना विशिष्ट टार्गेट देऊन प्रत्यक्ष जमिनीत स्तरावरचे काम कसे वाढवता येईल याचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे या सगळ्यांवर निगराणी ठेवून आहेत. भाजपने त्यांच्यावर ही प्रमुख जबाबदारीच सोपवली आहे.
#WATCH लखनऊ: उत्तर प्रदेश भाजपा की बैठक पर उत्तर प्रदेश सरकार में मंत्री दयाशंकर सिंह ने कहा, "लोकसभा चुनाव की तैयारियों को लेकर यह बैठक हुई थी। भाजपा प्रदेश में पूरी 80 सीटें कैसे जीते इसे लेकर रणनीति बनी है। पार्टी के सभी वरिष्ठ नेता बैठक में मौजूद थे।" pic.twitter.com/keVEhzKcv2 — ANI_HindiNews (@AHindinews) January 11, 2024
#WATCH लखनऊ: उत्तर प्रदेश भाजपा की बैठक पर उत्तर प्रदेश सरकार में मंत्री दयाशंकर सिंह ने कहा, "लोकसभा चुनाव की तैयारियों को लेकर यह बैठक हुई थी। भाजपा प्रदेश में पूरी 80 सीटें कैसे जीते इसे लेकर रणनीति बनी है। पार्टी के सभी वरिष्ठ नेता बैठक में मौजूद थे।" pic.twitter.com/keVEhzKcv2
एकीकडे उत्तर प्रदेश सारख्या सर्वात मोठ्या राज्यात भाजपची प्रमुख जबाबदारी विनोद तावडे यांच्यासारख्या मराठी नेत्याकडे असताना दुसरीकडे मराठी माध्यमांनी गौरवलेले “महाराष्ट्र लिमिटेड चाणक्यांची मात्र महाविकास आघाडीत आपल्या गटासाठी लोकसभेच्या डबल डिजिट जागा मिळवताना दमछाक होत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी शरद पवार गटाला 6 ते 10 एवढ्या मर्यादितच जागा लढवायला मिळणार आहेत. 18 ते 21 जागांपर्यंत शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तर 12 ते 15 जागांपर्यंत काँग्रेस निवडणुकीत आपले उमेदवार उतरवणार आहेत. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकावर 6 ते 10 एवढ्याच मतदारसंघांमध्येच निवडणूक लढवण्याचे समाधान मानावे लागणार आहे. त्यांना त्यापेक्षा जास्त जागा मिळण्याची सुताराम शक्यता नाही. त्यामुळे शरद पवारांच्या ज्या काही पॉवरफुल खेळ्या होतील, त्या फक्त 8 – 10 लोकसभा मतदारसंघांपुर त्याच मर्यादित राहणार आहेत.
एकीकडे विनोद तावडे यांच्यासारखा मराठी नेता उत्तर प्रदेश मधल्या 80 जागांच्या लढवण्याची रणनीती तयार करत असताना दुसरीकडे “महाराष्ट्र लिमिटेड चाणक्य” मात्र 8 – 10 जागांसाठी झगडताना दिसत आहेत. पण मूळात त्यांचा पक्ष त्यांच्याकडे टिकेल का नाही याची देखील वानवा आहेच!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App