मोदींसमोर मणिपूर मधला “म” ही उच्चारला नाही; पवारांच्या भाषणाने विरोधक निराश!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात एकतर शरद पवारांनी जायला नको होते आणि गेले तर त्यांनी मोदींना मणिपूर मुद्द्यावरून जरूर सुनवावे, अशी मोठी अपेक्षा काँग्रेस सह सर्व विरोधी नेत्यांनी पवारांकडून व्यक्त केली होती. पण प्रत्यक्षात पवारांनी मोदींसमोर मणिपूर मधला “म” देखील उच्चारला नाही. त्यामुळे पवारांच्या भाषणातून सर्व विरोधकांची आज पूर्ण निराशा झाली.Sharad pawar didn’t utter a single word on manipur infront of Modi, dismayed opposition unity

पवारांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी विशेषत्वाने उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर देशातला पहिला सर्जिकल स्ट्राइक केला याविषयी ठळकपणे बोलले. पण पवारांनी मोदींना काहीही सुनावले नाही. किंबहुना त्यांनी मणिपूर मधला “म” देखील उच्चारला नाही. उलट लोकमान्य टिळक पुरस्काराच्या यादीतील सर्व महान नेत्यांची नावे वाचून मोदी आज त्यांच्या पंक्तीला जाऊन बसले आहेत, असे गौरवद्गार पवारांनी काढले.पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यापूर्वी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, डॉ. मनमोहन सिंग या महान नेत्यांना टिळक पुरस्काराने गौरविले आहे. आज त्यांच्याच पंक्तीत नरेंद्र मोदी जाऊन बसले आहेत, असे पवार म्हणाले.

पवारांच्या या भाषणामुळे देशातल्या सर्व विरोधकांची प्रचंड निराशा झाली. पवारांनी मोदींबरोबर टिळक पुरस्काराचे व्यासपीठ शेअर करू नये यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले. कुमार सप्तर्षींसारख्या त्यांच्या जुन्या मित्रांनी त्यांची भेट घेऊन त्यांना तशी विनंती केली. पुण्यात टिळक चौकात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मोदी विरोधात जोरदार आंदोलन केले. पण पवार बधले नाहीत.

ते टिळक पुरस्कार सोहळ्यात मोदींसमवेत व्यासपीठावर बसलेच. इतकेच नाही तर मोदींशी हस्तांदोलन करत त्यांनी काही हास्यविनोद केले. पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप देखील मारली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि विरोधकांच्या सर्व आंदोलनावर अक्षरशः पाणी फेरले!!

विरोधकांची मेहनत वाया

विरोधकांची सगळी मेहनत पवारांच्या एका कृतीतून आणि आजच्या भाषणातून वाया गेली. पवारांनी मणिपूरच्या मुद्द्यावर मोदींना त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन सुनवावे, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली होती. त्याला ठाकरे गटातून संजय राऊत यांनी देखील पुष्टी दिली होती. पण पवारांनी तसे काहीच केले नाही. मणिपूर मधला “म” देखील त्यांनी मोदींसमोर उच्चारला नाही. त्यामुळे विरोधकांमध्ये प्रचंड निराशा पसरली.

Sharad pawar didn’t utter a single word on manipur infront of Modi, dismayed opposition unity

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात