‘’…. तेव्हा भारतीयांची छाती अभिमानाने फुलते’’ म्हणत मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव!


’हा पुरस्कार मोदींच्या कार्याची पोचपावती आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४१ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील  सरपरशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद  पवार, राज्यपाल बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष  दीपक टिळक आदींची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. Chief Minister Shinde showering praise on Prime Minister Modi

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “लोकमान्य टिळक सामन्य माणसाच्या मनातील भावना अचूक ओळखत होते. आजच्या काळात समाजातील सामान्य माणसाचे मन ओळखणारे पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्तरावरील नेते बनले आहेत. बाळ गंगाधर टिळक हे आपल्या कर्तृत्वाने लोकमान्य झाले होते. गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वासचा नारा देऊन सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या कार्याची पोचपावती या राष्ट्रीय सन्मानाने होत आहे.”

याशिवाय ‘’हा पुरस्कार मोदींच्या कार्याची पोचपावती आहे. जगात मोदींचं नाव आदरानं घेतलं जातं. कोणी ऑटोग्राफर घेतात, फोटो काढतात आणि जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना ग्लोबली पॉवरफुल्ल म्हणतात. तेव्हा अभिमानाने छाती फुलते.’’ असं म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केलं.

याचबरोबर “ब्रिटिशांविरोधात लढताना ज्यांच्या शब्दांच्या धार येत असे, अशा लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. त्यानिमित्त मी त्यांचं अभिनंदन करतो. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याचा नारा देत अनेकांना आत्मनिर्भर होण्यास मदत केली. ‘योग्य रस्ता येण्याची वाट बघण्यात दिवस घालवतो. मात्र आपल्याला याचा विसर पडतो की, रस्ते हे वाट बघण्यासाठी नाही तर चालण्यासाठी असतात’, असं लोकमान्य टिळक म्हणाले होते. त्यामुळे मोदींनी हाच उपदेश आत्मसात केला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम ते करत असल्याचं शिंदे म्हणाले.

Chief Minister Shinde showering praise on Prime Minister Modi

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात