विशेष प्रतिनिधी
मुंबई : काका – पुतण्यांची निवडणुकीच्या ऐन मध्यात जुंपली आणि अदानींना त्यांनी घेतले मधी!!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार प्रचंड रंगात आला असताना अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन पहाटेच्या शपथविधी बद्दल काही दावे केले. दिल्लीत एका व्यावसायिकाच्या घरी पाच बैठका झाल्या. त्या बैठकांना अमित शाह, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि गौतम अदानी हे देखील होते. त्यांच्यासमोर सगळे ठरले होते. परंतु ऐनवेळी शरद पवारांनी निर्णय बदलला. ते माघारी फिरले. मी सगळा ठपका माझ्यावर घेतला आणि इतरांना वाचविले, असे अजित पवार त्या मुलाखतीत म्हणाले. यातून अजित पवारांनी शरद पवारांना पुरते एक्सपोज केले. शरद पवार शब्दाला कसे पक्के नाहीत, सर्व वरिष्ठ नेत्यांसमोर काही कबुली देऊन ते कसे माघारी फिरले, याचे सविस्तर वर्णन अजित पवारांनी त्या मुलाखतीत केले. शरद पवारांच्या मनात काय चालले आहे, हे त्यांच्या पत्नीला देखील कळत नाही, असा टोला त्यांनी पवारांना हाणला.
अजितदादांच्या या मुलाखतीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर खळबळ उडाली. अनेकांच्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या.
Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल- उद्धव ठाकरेंनी मतांसाठी लाचारी पत्करली, आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही
पण शरद पवारांनी अजित पवारांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अजितदादांनी सांगितलेले सगळे धादांत खोटे असल्याचा दावा केला. मी अनेक उद्योगपतींना भेटतो. केवळ गौतम अदानींनाच नाही तर अंबानी, किर्लोस्कर, टाटा, बजाज या सगळ्या उद्योगपतींच्या घरी गेलो आहे आणि आजही जातो. मी अनेक मंत्र्यांना, गृहमंत्र्यांना वगैरे भेटतो, पण म्हणून त्या भेटीगाठींमध्ये कुठले कारस्थान होते असे समजायचे कारण नाही, असा दावा शरद पवारांनी केला. हा दावा करताना अजितदादांची सगळी विधाने त्यांनी खोटी ठरवायचा प्रयत्न केला.
निवडणुकीच्या ऐन मध्यावर काका – पुतण्यांमध्ये अशी जुंपली आणि त्या दोघांनीही गौतम अदानींना मध्ये घेतले. त्यामुळे अदानींना ठोकायची संधी संजय राऊत यांना मिळाली. महाविकास आघाडीचे सरकार गौतम अदानी यांनीच पाडले मुंबईतली धारावीतली कंत्राटे हवी होती, असा आरोप संजय राऊत आणि वर्षा गायकवाड यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App