वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लष्करात प्रशिक्षण घेत असलेल्या २११ जणांना गेल्या दहा वर्षात सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. प्रशिक्षणा दरम्यान ते गंभीर जखमी झाल्याने ते अपात्र ठरल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. Serious injury during military training, in ten years 211 retired; Also financial assistance from the Center
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, भारतीय लष्कर अकादमी आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमी तीनही प्रशिक्षण संस्थांमध्ये गेल्या १० वर्षांत २११ प्रशिक्षणार्थीना सेवामुक्त केले, असे संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. या सर्वाना केंद्र सरकारकडून आर्थिक साहाय्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. अपंगत्व प्रत्येकाला महिन्याला ९००० रुपये आर्थिक साहाय्य आणि महागाई भत्ता देण्यात येतो. २० टक्के अपंगत्व असलेल्यांना अपंगत्व निधी म्हणून दरमहा १६,२०० रुपये देण्यात येतात. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी १२.५ लाख, तसेच अन्य साहाय्यही केल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App