तृणमूलच्या नेत्यांचे सोशल मीडिया चालवित होते आय-पॅकचे पगारी नोकर, प्रशांत किशोर यांचे ममतांशी मतभेद झाल्यावर उघड


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्यांचे सोशल मीडिया आयपॅकचे पगारी नोकर चालवित होते. रणनितीकार प्रशांत किशोर यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद झाल्यावर तृणमूलच्या नेत्यांनीच ही माहिती उघड केली आहे.I-Pak’s paid servant running Trinamool leaders’ social media, was exposed after a disagreementof Mamata Banerge and , Prashant Kishor,

गेल्या वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष टीएमसीला प्रशांत किशोर यांची पूर्ण मदत मिळाली होती. किशोर यांची कंपनी आय-पकॅने निवडणूक रणनीती बनवण्यात मोठी भूमिका बजावली. पण आता ममता बॅनर्जी आणि तृणूमल कॉँग्रेस यांच्यातील वाद वाढू लागला आहे.



ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी त्यानंतर म्हटले आहे की त्यांच्या अकाऊंटवरून वन मॅन वन पोस्ट संदर्भात काही पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत. याबाबत त्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही.

आय-पॅकने गेल्या वर्षी जूनमध्ये वन मॅन वन पोस्ट उपक्रम सुरू केला होता. अनेक तरुण कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांची बाजू मांडली. पण त्यानंतर कोलकाता महापालिका निवडणुकीसाठी फिरहाद हकीम यांना तिकीट देण्यात आले, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला. अशा परिस्थितीत वन मॅन वन पोस्टच्या दाव्याबाबत पक्षांतर्गत प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र आता या उपक्रमामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

टीएमसी सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांची परवानगी न घेता ट्विट करण्यात आले आहेत. याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

आय-पॅकने म्हटले आहे की, कोणत्याही राजकारण्याची डिजिटल मालमत्ता वापरत नाही. जो कोणी असे दावे करत आहे, त्याला एकतर माहिती नाही किंवा तो खोटे बोलत आहेत, असे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले आहे. त्याचवेळी हे देखील ठळकपणे सांगितले गेले आहे की तयार केलेली सोशल मीडिया अकाऊंट बंगालच्या निवडणुकीपूर्वीच सक्रिय होती. नंतर सर्व पक्षाकडे सुपूर्द करण्यात आली आणि प्रत्येक निर्णय पक्षाकडूनच घेतला जात होता.

वन मॅन वन पोस्ट उपक्रमामुळे टीएमसीमध्येच अंतर्गत युद्ध सुरू झाले आहे. अभिषेक बॅनर्जी यांना युवा नेत्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत असून, या सर्वांच्या वतीने ट्विट करून समर्थन दर्शवले जात आहे. मात्र यामुळे अनेक दिग्गज संतप्त झाले आहेत. आता ममता बॅनर्जी स्वबळावर पक्षाला पुढे नेऊ इच्छित असल्याचीही बातम्याही पसरत आहेत.

त्यांना यामध्ये कोणत्याही बाहेरील एजन्सीचा हस्तक्षेप नको आहे. त्यामुळेच प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या त्यांच्या मतभेदाच्या बातम्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. सध्या हा वाद सोडवण्यासाठी ममता बॅनर्जी स्वत: अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी शनिवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

या बैठकीला अभिषेक बॅनजीर्ही उपस्थित राहणार आहेत. अभिषेक बॅनर्जी यांची सकारात्मक चर्चा झाली नाही तर ते आपल्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामाही देऊ शकतात अशाही चर्चा आहे.

I-Pak’s paid servant running Trinamool leaders’ social media, was exposed after a disagreementof Mamata Banerge and , Prashant Kishor,

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात