वृत्तसंस्था
जौनपूर : भारत विरोधी दहशतवादाशी लढण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे. त्या पक्षाच्या सरकारांनी दहशतवादाशी कठोरपणे कधी मुकाबलाच केला नाही, असा हल्लाबोल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. यासाठी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार मनीष तिवारी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला दिला आहे.Senior leader of Congress party Manish Tewari in his book has accepted the truth that the then Congress govt did not act strongly against terrorism after 2008 Mumbai terror attacks
खासदार मनीष तिवारी यांनी आपल्या नव्या पुस्तकातून भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणावर भाष्य करताना केंद्र सरकारने 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यानंतर कठोरपणे प्रतिकार करायला हवा होता. पण त्यात सरकार कमी पडले, असे प्रतिपादन केले आहे. नेमक्या याच संदर्भाचा हवाला राजनाथ सिंग यांनी देऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
#WATCH | "Senior leader of Congress party Manish Tewari in his book has accepted the truth that the then Congress govt did not act strongly against terrorism after 2008 Mumbai terror attacks," Defense Minister Rajnath Singh in UP's Jaunpur pic.twitter.com/iojvdHZokE — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 27, 2021
#WATCH | "Senior leader of Congress party Manish Tewari in his book has accepted the truth that the then Congress govt did not act strongly against terrorism after 2008 Mumbai terror attacks," Defense Minister Rajnath Singh in UP's Jaunpur pic.twitter.com/iojvdHZokE
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 27, 2021
भारत विरोधी दहशतवादाशी मुकाबला करताना काँग्रेसची भूमिका कायमच कमजोर राहिली आहे. त्या पक्षाच्या सरकारांनी कधी देशविरोधी ताकदींशी कठोरपणे मुकाबलाच केलेला नाही, अशा शब्दांमध्ये राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. जेव्हा त्यांच्याच पक्षाचे खासदार मनीष तिवारी हे स्वतःहून आपल्याच सरकारच्या कमजोर संरक्षण धोरणावर टीका करतात तेव्हा आपण वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे, असा टोला देखील त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला लगावला.
मुंबई हल्ल्याच्या वेळी केंद्रात सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार होते. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे अपेक्षा देश बाळगून होता. परंतु त्यावेळी तसे घडले नाही. याचा उल्लेख खासदार मनीष तिवारी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. आणि तोच संदर्भ देऊन आज राजनाथसिंह यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App