महाराष्ट्रात नवे कोरोना निर्बंध : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची भीती, ठाकरे सरकारची नवी नियमावली, वाचा सविस्तर…

New Corona Restrictions in Maharashtra Fear of Omicron variant, new rules by Thackeray government

New Corona Restrictions in Maharashtra : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभरात दहशत पसरवली आहे. डेल्टा व्हेरियंटपेक्षा दहापट वेगाने पसरणाऱ्या या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने महाराष्ट्र सरकारचीही चिंता वाढवली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना टास्क फोर्स आणि जिल्हाधिकार्‍यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा राज्य लॉकडाऊनकडे तर जात नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून तातडीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे मात्र जारी करण्यात आली आहेत.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभरात दहशत पसरवली आहे. डेल्टा व्हेरियंटपेक्षा दहापट वेगाने पसरणाऱ्या या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने महाराष्ट्र सरकारचीही चिंता वाढवली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना टास्क फोर्स आणि जिल्हाधिकार्‍यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा राज्य लॉकडाऊनकडे तर जात नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून तातडीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे मात्र जारी करण्यात आली आहेत.

काय आहे नवी नियमावली?

 • ज्या लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनाच सार्वजनिक अथवा खासगी वाहनांमध्ये प्रवासाची परवानगी असेल.
 • शिवाय लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच मॉल, सभागृह, कार्यक्रमांमध्ये प्रवेश दिला जाईल.
 • राज्य सरकारने युनिव्हर्सल पास दिले आहेत. प्रवास करताना लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
 • मास्क वापरण्याचे नियम काटेकोरपणे पाळले जातील. मास्क वापरताना कोणी आढळून आल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल.
 • दुकानात मास्कशिवाय ग्राहक आढळल्यास दुकानदारांकडून 10 हजार रुपये आकारले जातील.
 • मॉलमध्ये मास्कशिवाय कोणी आढळल्यास मॉल मालकाकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल.
 • राजकीय सभा, कार्यक्रमांमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास ५० हजार रुपये दंड वसूल केला जाईल.
 • टॅक्सी किंवा खासगी वाहनांमध्ये मास्क न वापरल्यास प्रवाशांकडून 500 रुपये आणि वाहनधारकांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
 • भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी स्टेडियममध्ये केवळ 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला मान्यता.
 • दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या व्यक्तींची RTPCR चाचणी 72 तासांच्या आत निगेटिव्ह होणे आवश्यक आहे.
 • ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे.
 • महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांकडे लसीचे प्रमाणपत्र नसेल, तर ७२ तासांच्या आतील आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणे आवश्यक आहे.
 • याशिवाय थिएटर, बँक्वेट हॉल, ऑडिटोरियममध्ये ५० टक्के लोकांच्या उपस्थितीला मान्यता दिली जाईल.
 • सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी असून असे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
 • सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमध्ये एकमेकांपासून सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे.

केंद्राचा सर्व राज्यांना अलर्ट

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क केले आहे. केंद्र सरकारने एक पत्र लिहून राज्यांना इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी आणि चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्सवाना यांसारख्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विशेष तपासणी करण्यात यावी. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था