मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बैठक घेणार ; जागतिक स्तराच्या नव्या विषाणूवर चर्चा करणार


कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात आता भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यालयाने केल्या आहेत.Chief Minister Uddhav Thackeray will hold a meeting tomorrow; Will discuss a new global virus


विशेष प्रतिनिधी

पुणे : मागील दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात चांगलाच हाहाकार माजवला होता.दरम्यान हळूहळू कोरोणाच सावट कमी झालं असून सगळी परिस्थिती आटोक्यात आली होती.दरम्यान दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणू आढळलल्याने जगापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात आता भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यालयाने केल्या आहेत.



आज (२७ नोव्हेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेरिएंटसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्या बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. बैठकीत सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित असणार आहेत.या बैठकीत जागतिक स्तराच्या नव्या विषाणूवर चर्चा करणार असून यासंदर्भात केंद्राशी बोलून काही निर्बंध आणावे लागतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

पुढे अजित पवार म्हणाले की , सध्या तरी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर हटवणार नसल्याची माहिती पवारांनी दिली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानासंदर्भात केंद्राशी चर्चा करू, असेही पवारांनी सांगितले.

Chief Minister Uddhav Thackeray will hold a meeting tomorrow; Will discuss a new global virus

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात