कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक मानले गेलेले ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचं आज (गुरुवार) वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. Senior agriculturist and wellknown scientist M S Swaminathan passed away
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या स्वामीनाथन, मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन आहेत. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता.
स्वामिनाथन हे कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. 1972 ते 1979 या काळात त्यांनी ‘भारतीय कृषी संशोधन परिषदे’चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. स्वामीनाथन यांची गणना भारतातील महान कृषी शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून केली जाते. देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App