गरवारे क्लबच्या निवडणुकीचा इशारा काय??; काका, आता तुमच्यावर भरोसा नाय!!


नाशिक : मुंबईतील प्रतिष्ठित गरवारे क्लबच्या निवडणुकीचा निकालाची बातमी मराठी माध्यमांनी अतिशय किरकोळ स्वरूपात देऊन ती दाबून टाकली. पण माध्यमांनी बातमी दाबली म्हणून त्यातले सत्य बाहेर यायचे थांबले नाही, जे बाहेर यायचे ते सत्य बाहेर आलेच!! Garware club elections : banking on sharad pawar’s support may prove wrong in henceforth elections

ज्या गरवारे क्लबवर शरद पवारांचे तब्बल 30 वर्षे वर्चस्व होते, ते संख्याबळ यंदाच्या निवडणुकीत क्लबच्या मतदारांनी केवळ घटविले असे नाही, तर ते पूर्ण संपुष्टातच आणले. शरद पवार पुरस्कृत पॅनलचा गरवारे क्लबच्या तब्बल 13000 मतदारांनी पूर्ण पराभव केला. स्वतः शरद पवार या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून जरूर निवडून आले, पण मतदारांनी त्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा टिकवली, एवढाच त्याचा मर्यादित अर्थ आहे.

पण त्या पलीकडे जाऊन गरवारे क्लबच्या मतदारांनी दिलेला इशारा हा अधिक गंभीर आहे आणि त्याचा सखोल विचार करण्याची गरज आहे. तो इशारा म्हणजे काका, आता तुमच्यावर भरोसा नाय!! हा आहे. म्हणजेच शरद पवारांनी उभे केलेले, त्यांनी पाठबळ दिलेले किंवा त्यांनी सांगितलेले उमेदवार इथून पुढे कोणत्याही निवडणुकीत निवडून येतीलच, याची कोणतीही खात्री उरलेली नाही!!

एरवी शरद पवार आपण स्वतःच मोठे ब्रँड आहोत, असे समजून आपण म्हणू तो उमेदवार म्हणू तिथून निवडून आणू शकतो, असे सांगत असतात. अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर, पक्ष गेला किंवा चिन्ह गेले तरी काही फरक पडत नाही. आपण आत्तापर्यंत चार-पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुका लढवून जिंकल्याचे शरद पवारांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये सांगितले. इतकेच काय राष्ट्रवादीचा आता आश्वासक चेहरा कोणता??, असा प्रश्न एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारल्यावर शाळेत हजेरी घेताना विद्यार्थी जसा हात वर करतो, तसा हात वर करून शरद पवार म्हणाले होते, राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा म्हणजे शरद पवार. गरवारे क्लबच्या निवडणुकीने याच आश्वासक चेहऱ्याला तडा दिला आहे.शरद पवारांच्या भरवशावर उभे राहिलेले सगळेच्या सगळे उमेदवार गरवारे क्लबच्या 13000 मतदारांनी पाडून टाकले, हा या निवडणुकीतला खरा गंभीर इशारा आहे. याचा अर्थ असा की पवारांनी सांगितलेला उमेदवार इथून पुढे निवडूनच येईल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही.

गरवारे क्लबची निवडणूक ही त्या क्लबपूर्ती मर्यादित असली, तरी त्यातली 13000 ही मतदार संख्या, गरवारे क्लबची विशिष्ट प्रतिष्ठा, उच्चभ्रू वर्तुळात असलेला त्या मतदारांचा वावर हे सर्व लक्षात घेता शरद पवारांच्या नेतृत्वाची ती लिटमस टेस्ट होती. ही लिटमस टेस्ट सलग 30 वर्षे ते पास करत आलेही होते. पण आता तीच लिटमस टेस्ट ते पूर्णपणे हरले आहेत. हा शरद पवारांच्या भरवशावर पुढची विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी खरा गंभीर इशारा आहे.

शरद पवारांनी आत्तापर्यंत अनेकदा हे देखील सांगून झाले, की आपल्या साथीला सुरुवातीला 56 आमदार होते. त्यातले 50 जण सोडून गेले. पण त्यापैकी कोणीही निवडून आले नाही. उलट त्यांच्या जागी आपण नवे 50 आमदार निवडून आणले. याचा अर्थ शरद पवारांनी 50 आमदारांना आपल्या ब्रँडच्या बळावर निवडून आणले. पण आता हा देखील इतिहासच झाला आहे. कारण गरवारे क्लबच्या मतदारांनी दिलेला कौल हेच सांगतोय, की पवार आता कितीही भाकऱ्या फिरवोत, त्या उलट्या पालट्या करोत, त्याने काहीही फरक पडणार नाही. मतदार त्यांचे ऐकून मतदान करणार नाहीत.

गरवारे क्लबच्या मतदारांनी पवारनिष्ठ पॅनेलचे सर्व उमेदवार पाडून हेच दाखवून दिले, की काका आता तुमच्यावर भरोसा नाय!! त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या भरवशावर उभे राहणाऱ्या उमेदवारांनी सावध राहावे, हा या निवडणुकीच्या निकालाने “पवार भरवशींना” दिलेला गंभीर इशारा आहे!!… इथे भरवशाच्या ** कुणाला कोण??, हे लिहित नाही!!

Garware club elections : banking on sharad pawar’s support may prove wrong in henceforth elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात