वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात खोटी माहिती पसरवत असलेल्या 6 युट्यूब चॅनेलचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या युट्यूब चॅनेलद्वारे पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी 100 हून अधिक वाहिन्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर पीआयबीने सहा वेगवेगळ्या ट्विटची मालिका फॅक्ट चेक कक्षाने जारी केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या कक्षाची ही दुसरी कारवाई आहे या कारवाईच्या माध्यमातून युट्यूब वाहिन्यांचा पर्दाफाश केला आहे. Second central government crackdown on YouTube channels that spread false, offensive information
या सहा युट्युब वाहिन्या एका समन्वित अपप्रचार नेटवर्कचा भाग म्हणून कार्यरत असल्याचे आढळले, या वाहिन्यांची सदस्यसंख्या जवळपास 20 लाख होती आणि त्यांच्या चित्रफिती 51 कोटींहून अधिक वेळा पाहिल्या गेल्या आहेत. पीयआयबीद्वारे तथ्य -तपासणी केलेल्या या यूट्युब वाहिन्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.
Nation Tv, Sarokar Bharat, Nation, Swarnim Bharat, Samvaad Samachar
पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने कारवाई केलेल्या या यूट्यूब चॅनेलनी निवडणुका, सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या संसदेतील कार्यवाही, भारत सरकारचे कामकाज इत्यादींबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील बंदीबाबत खोटे दावे आणि भारताचे माननीय राष्ट्रपती, भारताचे माननीय सरन्यायाधीश यांच्यासह वरिष्ठ घटनात्मक अधिकाऱ्यांची बनावट विधाने दाखवणे याचा यात समावेश आहे.
बनावट बातम्यांच्या आधारावर कमाई करणारी ही चॅनेल बनावट बातम्यांच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी आणि या बातम्या खऱ्या आहेत यावर प्रेक्षकांचा विश्वास बसावा तसेच कमाई करण्याच्या दृष्टीने, या चॅनेल्सद्वारे प्रसारित चित्रफितीच्या माध्यमातून, चॅनेलवर प्रेक्षक संख्या वाढावी यासाठी ही चॅनेल्स बनावट, क्लिकबेट, लघुप्रतिमा (थंबनेल) आणि दूरचित्रवाहिन्यांवरील वृत्त निवेदकाच्या प्रतिमा वापरत होती. पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने केलेली ही दुसरी कारवाई आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App