विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी जॉर्ज गेले. 2022 मध्ये मुलायम गेले आणि 2023 च्या सुरवातीलाच शरद यादव गेले. समाजवादी चळवळीतील धुरंधर डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या प्रेरणेतून राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रवेश केलेले आणि नंतर बराच काळ देशाच्या राजकारणात कर्तृत्व गाजवलेले हे सगळे समाजवादी साथी एकेकाळी समतेची गाणी गाईले. पण भारतीय राजकारणाने काळाच्या ओघात अशी काही करवट घेतली, की ते विस्मृतीत जाऊन शेवटी अस्तंगत झाले. After George Fernandes and Mulayam Singh Sharad Yadav passed away, ending socialist era of Indian politics
जॉर्ज फर्नांडिस, मुलायम सिंह यादव आणि शरद यादव यांच्या निधनाने समाजवादी चळवळ आता देशाच्या राजकीय इतिहासात एक प्रकरण बनून राहिली आहे. 1970 ते 1990 हा राजकीय कालखंड असा होता, की हे सगळे समाजवादी धुरंधर भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. आधी इंदिराजी आणि नंतर राजीवजी यांना बाजूला सारून, पराभूत करून समाजवादी चळवळीतील हे नेते देशाचे सगळे राजकारण हातात घेणार. देशाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सर्वच बाबतीत समाजवादी दिशा देणार असे वाटत होते. जॉर्ज फर्नांडिस तर यात फार आघाडीवर होते. मुलायम सिंह, शरद यादव, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार हे त्यांच्या पाठोपाठ होते. त्यावेळी कम्युनिस्ट बंगाल आणि केरळ पुरते मर्यादित होते, तर भाजप – शिवसेनेचा हिंदुत्ववादी राजकीय प्रवाह फारच क्षीण होता.
PM Narendra Modi expresses condolences over the demise of Former Union Minister Sharad Yadav "In his long years in public life, he distinguished himself as MP and Minister. He was greatly inspired by Dr Lohia’s ideals. I will always cherish our interactions," tweets PM Modi pic.twitter.com/JIIrmIpJJP — ANI (@ANI) January 12, 2023
PM Narendra Modi expresses condolences over the demise of Former Union Minister Sharad Yadav
"In his long years in public life, he distinguished himself as MP and Minister. He was greatly inspired by Dr Lohia’s ideals. I will always cherish our interactions," tweets PM Modi pic.twitter.com/JIIrmIpJJP
— ANI (@ANI) January 12, 2023
त्यामुळे ही सगळी समाजवादी मंडळी समतेच्या घोषात सत्ता काबीज करणार असे वाटत होते. पण असे वाटत असतानाच 1990 मध्ये मूळचे काँग्रेसी विश्वनाथ प्रताप सिंह काँग्रेस मधून फुटून समाजवाद्यांच्या गोटात शिरले. अल्पकाळाच्या सत्तेत त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि देशाचे सगळे राजकारणच बदलून गेले. त्याचे बाकीचे परिणाम वेगळे असले, तरी समाजवादी साथी गाती समतेची गाणी हे पूर्ण संपुष्टात आले आणि हे सगळे समाजवादी साथी ठाकूर, ओबीसी, यादव, जाट, मुस्लिम या राजकारणात कायमचे गुरफटले. समाजवादी साथींमध्येच कायमची फूट पडली या सगळ्या समाजवादी साथींनीच यातून वेगवेगळे पक्ष काढले आणि ते आपापल्या प्रदेशांपुरते क्षत्रप बनून राहिले.
शरद यादव पण या राजकारणाला अपवाद नव्हते. त्यांनी पण बाकीच्या समाजवादी साथींसारखाच मूळ समाजवादी पक्ष, जनता पक्ष, जनता दल, समता पक्ष, संयुक्त जनता दल आणि शेवटी राष्ट्रीय जनता दल असा राजकीय प्रवास केला.
विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री राहिले. पण बिहारच्या मुख्यमंत्री पदाने त्यांना कायम हुलकावणी दिली. अखेरच्या काळात शरद यादवांचे नितीश कुमार यांच्याशी पटले नाही. नितीश कुमार यांनी शरद यादव यांना बिहारमधील राजकीय वर्तुळापासून दूर ठेवले होते. आणि आता तर शरद यादव यांच्या निधनाने समाजवादी साथी एक एक सोडून जाती, असे म्हणायची वेळ आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App