कॉँग्रेस पक्षाने प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचारच केला आहे. गरीबांचा विचारदेखील ते करत नाही. ही वादग्रस्त पार्टी असून निवडणूक आल्यावर नवीन कपडे परिधान करते, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.Scams and corruption in every state of the Congress, not even the awareness of the poor, Amit Shah’s attack
विशेष प्रतिनिधी
डेहराडून : कॉँग्रेस पक्षाने प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचारच केला आहे. गरीबांचा विचारदेखील ते करत नाही. ही वादग्रस्त पार्टी असून निवडणूक आल्यावर नवीन कपडे परिधान करते, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
डेहराहून दौऱ्यात एका सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले, निवडणुक तोडांवर आल्यावर काँग्रेस नवीन कपडे परिधान करते. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचार आणि घोटाळे करणारा पक्ष आहेत्. त्यांनी प्रत्येक राज्यात घोटाळेच केले आहे. ते गरिबांचे विचार देखील करत नाहीत.गरिब कल्याण आणि प्रशासन हे केवळ मोदींच्या नेतृत्वामध्ये फक्त भाजपच देशाला देत आहे.
Amit Shah Uddhav Thackeay Visit : अमित शहा यांची बैठक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना ; उद्धव ठाकरे-अमित शहा ‘भावी सहकारी’ होणार का?
शहा म्हणाले, काँग्रेसने प्रत्येक वेळी आपले स्वार्थ पाहिले. मात्र उत्तराखंड मधील देवभूमीचा विकास केला नाही. मात्र आता उत्तराखंडमधील जनतेने भाजपला बहुमत दिले असून, देवभूमीचा विकास आता होणार आहे. काँग्रेस मुस्लिम समाजाला नमाज अदा करण्यासाठी सुट्टी देते. तर कधी-कधी नमाजीमुळे नॅशनल हायवे देखील जाम करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App