वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरातील विविध लवादांमध्ये अनेक जागा रिक्त असल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची खरडपट्टी काढली आहे. ‘‘सरकारला न्यायालयाबद्दल आदर नाहीये, असेच आम्हाला वाटत आहे. तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहात आहात,’’ अशा शब्दांत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी कोरडे ओढले. SC targets central govt.
न्यायालयाने केंद्र सरकारला या रखडलेल्या नेमणुका करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. न्यायालयांप्रमाणेच देशभरात विविध प्रकारच्या व्यावसायिक, पर्यावरण विषयक अशा वादांवर तोडगा काढण्यासाठी लवादांची देखील स्थापना करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या लवादांमध्ये कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्गाच्याही अनेक जागा रिकाम्या आहेत. वारंवार सांगून देखील त्या जागा सरकारकडून भरल्या जात नसल्यामुळे अखेर आज न्यायालयाने सरकारला परखड शब्दांमध्ये खडसावले.
“तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा पाहात आहात. आम्ही दिलेल्या निर्णयांना तुमच्या लेखी अजिबात किंमत नाहीये का?” असा खरमरीत सवाल न्यायालयाने केला.
यावेळी न्यायालयाने प्रशासनाच्या कार्यवाहीवर तीव्र नापसंती व्यक्त केली. “न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार आत्तापर्यंत संबंधित लवादांवर नियुक्त्या का करण्यात आलेल्या नाहीत? अशा प्रकारे नियुक्त्या न करून तुम्ही या लवादांचे खच्चीकरण करत आहात. असे न्यायालयाने नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App