भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करून ते म्हणाले की, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार, सत्यमेव जयते! Satyamev Jayate Devendra Fadnavis reaction after the suspension of 12 BJP MLAs was canceled, read in detail
वृत्तसंस्था
पणजी : भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करून ते म्हणाले की, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार, सत्यमेव जयते!
।। सत्यमेव जयते।।राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो.#12MLAs #Maharashtra #BJP — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 28, 2022
।। सत्यमेव जयते।।राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो.#12MLAs #Maharashtra #BJP
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 28, 2022
फडणवीस सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. या निर्णयाचं स्वागत करताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महाविकास आघाडील सणसणीत चपराक बसली आहे. राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर होता. संविधानाला धरून नव्हता. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, सत्यमेव जयते! ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनात आमच्या आमदारांनी आवाज उठवला. त्यावेळी या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि कोर्टाचे आभार मानतो. कोर्टाचा हा निर्णय लोकशाही मूल्य वाचवणारा असून दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीला सणसणीत चपराक लगावणारा आहे. या सरकारने घेतलेला हा निर्णय असंवैधानिक होता. नैतिकमूल्यांना धरून नव्हता. निरपेक्ष नव्हता. हा निर्णय बेकायदेशीर होता, असंही ते म्हणाले.
हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले ❗️#BJP #12MLAs #Maharashtra — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 28, 2022
हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता.
आज लोकशाहीचे संरक्षण झाले ❗️#BJP #12MLAs #Maharashtra
भाजपच्या सर्व आमदारांचं अभिनंदन करत ते म्हणाले की, राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचं मी आधीपासून सांगत होतो. हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं मी नमूद केलं होतं. कृत्रिम संख्याबळाच्या जोरावर सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयामागे कोणतंही महत्त्वाचं कारण नव्हतं. म्हणूनच कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं आणि आमच्या बाजूने निकाल दिला. हा केवळ 12 आमदारांचा प्रश्न नव्हता तर 12 मतदारसंघातील 50 लाखांहून अधिक नागरिकांचा प्रश्न होता, असं सांगतानाच डेमोक्रसी सेव्हड असंही ट्वीट त्यांनी केलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App