प्रतिनिधी
मुंबई : चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. ६६ वर्षीय सतीश कौशिक यांचे मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु आता त्यांच्या मृत्यूप्रकरणी एका महिलेने घातपाताचा खळबळजनक दावा केला आहे. सान्वी मालू असे या महिलेचे नाव असून कुबेर ग्रूपचा संचालक विकास मालू याची ती दुसरी पत्नी आहे. तिने दिल्ली पोलिसांत जाऊन एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी तिची स्टेटमेंट घेतले आहे आणि घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला आहे. Satish Kaushik Death Case; A police investigation takes a tragic turn after a murder charge
या संबंधित महिलेने तिच्या पतीने सतीश कौशिक यांची १५ कोटींसाठी हत्या केली आहे, अशी तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सान्वी मालूशहिने हा खळबळजनक दावा केला आहे.
अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे वयाच्या 66व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून शोक व्यक्त
अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक हे त्यांनी दिलेले पैसे या महिलेच्या पतीकडून परत मागत होते. परंतु या महिलेचा पती हे पैसे परत देऊ इच्छित नव्हता, असा आरोपही या महिलेने केला आहे. कौशिक यांची हत्या पतीनेच औषधे देऊन केली असेही तिने पोलिसात सांगितले आहे. सतीश कौशिक मृत्यूपूर्वी एका पार्टीत सहभागी झाले होते पोलिसांनी दिल्ली येथील फार्महाऊसमधून काही औषधे सुद्धा जप्त केली आहे.
या तक्रारदार महिलेने ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. महिलेने यावेळी सांगितले की, सतीश कौशिक यांच्याशी पतीनेच ओळख करून दिली होती. कौशिक तिला भारत आणि दुबईमध्ये नेहमी भेटत होते आणि तिच्या पतीनेच म्हणजे विकास मालू यानेच कौशिक यांची पूर्वनियोजित कट करून हत्या केली आहे, असा दावा या महिलेने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App