राजस्थानच्या सर्वात तरुण खासदार बनलेल्या संजना जाटव यांनी जिंकल्यानंतर केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानमधील भरतपूरमधून मोठा विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या सर्वात तरुण उमेदवार संजना जाटव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निवडणुकीतील विजयानंतर संजना जाटव आपल्या समर्थकांसोबत नाचत सेलिब्रेशन करत आहेत, ज्याला सोशल मीडियावर लोक खूप पसंत करत आहेत. त्या अवघ्या 25 वर्षांच्या आहेत.Sanjana Jatav, who became the youngest MP of Rajasthan, performed a spectacular dance after winning, the video went viral

संजना जाटव नाचत असताना बॅकग्राऊंडमध्ये त्यांच्या कॅम्पेनमधलं एक गाणं वाजतंय ज्यावर सगळे नाचताना दिसतात. आता जर भरतपूर लोकसभा जागेबद्दल बोलायचे झाले तर संजना जाटव या येथून 51983 मतांनी विजयी झाल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार रामस्वरूप कोळी यांचा पराभव केला आहे.



या निवडणुकीत विजयी झालेल्या संजना जाटव यांना 579890, रामस्वरूप कोळी यांना 527907 मते मिळाली. या जागेवरून बसपाने महिला उमेदवार अंजिला जाटव यांनाही उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. अंजिला जाट यांना दहा हजारांपेक्षा कमी मते मिळाली. त्यांना एकूण 9508 मतांवर समाधान मानावे लागले.

राजस्थानमध्ये कोणाकडे किती जागा आहेत?

यावेळी भरतपूर लोकसभा जागेवर एकूण 6 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते, त्यात तीन अपक्ष रिंगणात होते. भरतपूरमध्ये NOTA ला 5443 मते मिळाली. राजस्थानमधील लोकसभेच्या सर्व 25 जागांच्या निवडणूक निकालांबद्दल बोलायचे झाल्यास, राज्यातील सत्ताधारी भाजपने 14 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने 8 जागा जिंकल्या आहेत. सीपीआयएमने एक, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने 1 आणि भारत आदिवासी पक्षाने 1 जागा जिंकली आहे.

Sanjana Jatav, who became the youngest MP of Rajasthan, performed a spectacular dance after winning, the video went viral

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात