समाजवादी पक्षाचा क्रेडीट पळविण्याचा प्रयत्न, पूर्वांचल एक्सप्रेस वे चे केले सांकेतिक उद्घाटन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता जाऊन चार वर्षे झाली तरी विकासकामांचे श्रेय घेण्याचा आगाऊपणा समाजवादी पक्षाकडून सुरू आहे. उत्तर पदेशातील महत्वाकांक्षी पूर्वांचल एक्सप्रेस वे चे क्रेडीटही पळविण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाकडून करण्यात आला. या महामार्गाचे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चोरटेपणाने उद्घाटन केले.Samajwadi Party’s attempt to snatch credit, symbolic inauguration of Purvanchal Expressway

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पूर्वांचल एक्सप्रेस – वेचं उद्घाटन आयोजित करण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या एक्सप्रेस-वेचं सांकेतिक उद्घाटन केले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या सांकेतिक उद्घाटनाचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी समाजवादी पक्षाच्या कामाचं श्रेय पळवण्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर केला आहे.



‘फीत आली लखनऊहून आणि नवी दिल्लीहून कात्री आली… सपाच्या कामचं श्रेय घेण्यासाठी ताणाताणी सुरू आहे. एकटं बसून लखनऊवाल्यांनी समाजवादी पूर्वांचल एक्सप्रेस -वेच्या लांबीचा आकडा घोकून पाठ केला असेल, अशी आशा आहे. सपा बहुरंगी पुष्पवषार्वानं याचं उद्घाटन करून एकरंगी विचारधारा असणाऱ्यांना प्रत्यूत्तर देईल’, असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलंय.

अखिलेश यादव यांनी सोमवारी पूर्वांचल एक्सप्रेस-वेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारवर कामाच्या गुणवत्तेशी तडजोड केल्याचा आरोप केला आहे. ज्या गुणवत्तेसोबत पूर्वांचल एक्सप्रेस – वे उभारला जायला हवा होता त्यात तडजोड करण्यात आलीय.

नुकत्याच झालेल्या पावसानं या एक्सप्रेस वेच्या गुणवत्तेचा पदार्फाश केलाय. भारतीय जनता पक्षानं कसली भेसळ केलीय याची कल्पना नाही पण या एक्सप्रेसवेवर वेग वाढवला तर तुम्हाला कंबरदुखी आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

Samajwadi Party’s attempt to snatch credit, symbolic inauguration of Purvanchal Expressway

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub