वृत्तसंस्था
लक्ष्मणपुरी : उत्तर प्रदेशमधील ‘दुसरे काश्मीर’ म्हणून बदनाम झालेले आणि कैराना या गावातील हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणारा ‘मास्टरमाईंड’ माजी आमदार नाहिद हसन याला समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाचा निर्णय हा भाजपने ‘जिन्नावाद’ , असे म्हटले आहे. Samajwadi Party nominates Kairana’s fanatical goonda forcing Hindus to flee
हसन हा एक गुंड असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. तो या भागाचा आमदार होता तर त्याची आई तबस्सुम या माजी खासदार होत्या. त्या दोघांच्या विरोधात गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पोलिसांनी ‘उत्तरप्रदेश गुंड आणि समाजविरोधी तत्त्वे प्रतिबंधित’ कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली होती. हसन हा एक कारागृहात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
दुसरीकडे पश्चिमी उत्तरप्रदेशातील मेरठ शहरातून समाजवादी पक्षाने रफीक अंसारी या आणखी एका गुंडाला उमेदवारी दिली आहे. त्याच्या विरोधातही अनेक गुन्हे नोंद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App