S Jaishankar : आयुष्य खटाखट नाही, ते खडतर, कठोर मेहनतीचे; परराष्ट्र मंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले

S Jaishankar

वृत्तसंस्था

जिनिव्हा : S Jaishankar:  “इंडी” आघाडीचे सरकार आल्यास जनतेच्या बॅंक खात्यात खटाखट पैसे जमा होतील, असे उथळ वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची राळ उडवून दिली होती. त्यावरून आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांना टोला हाणला. आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही. ते खडतर आहे, इथे कठोर मेहनत घ्यावी लागते, असे जयशंकर म्हणाले. जिनिव्हा येथील भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधींच्या खटाखट वक्तव्याचे वाभाडे काढले. S Jaishankar

नेमकं काय म्हणाले एस.जयशंकर?

एस. जयशंकर यांनी जिनिव्हा येथे भारतीय समुदायाला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोगा मांडला. काही लोक चीनमधून केलेल्या आयातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आपण चीनकडून इतकी आयात का करतो, असं विचारलं जातं. मात्र, 1960 ते 1990 च्या काळातील सरकारांनी कधीही उत्पादनाकडे लक्ष दिले नाही. आज जेव्हा आम्ही लोकांशी चर्चा करतो, तेव्हा आमच्याकडे संसाधने नाहीत त्यामुळे आम्ही उत्पादन क्षेत्राकडे वळू शकत नाही, असं सांगितलं जातं. मुळात जोपर्यंत उत्पादन क्षेत्र मजबूत होत नाही, तोपर्यंत तुम्ही जागतिक महासत्ता बनू शकत नाही, असे परखड मत शी त्यांनी व्यक्त केले. S Jaishankar


Maharashtra :केंद्र सरकारचेही ‘महाराष्ट्र प्रथम, मराठी प्रथम’ हे ब्रिद, महत्वाच्या योजना मान्य, गुंतवणूकीतही वाढ


राहुल गांधींना लगावला टोला

पुढे बोलताना, त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनाही टोला लगावला. देशाचा विकास करण्यासाठी योग्य त्या कार्यक्रमांची आणि धोरणांची आवश्यकता असते. आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही, इथे कठोर परिश्रम करावे लागतात, असे ते म्हणाले. S Jaishankar

S Jaishankar heard to Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात