विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मेक इन इंडिया सारखा अभिनव उपक्रम राबवून आंतरराष्ट्रीय जगतात वेगळी झेप घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या भारताला आता तेल आणि वायू क्षेत्रात संशोधनाची फार मोठी संधी चालून आली आहे. रशियाने आपल्या सखालिन बेटावर तेल आणि वायू संशोधनास पुढाकार घेण्याची भारताला ऑफर दिली आहे या क्षेत्रातून अमेरिका आणि युरोप बॅक आउट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताला रशियाने दिलेली ऑफर भू राजनैतिक पातळीवर फार महत्त्वाची आहे. Russia’s strategic offer to India for oil and gas exploration on Sakhalin Island!!
युरोपियन आणि अमेरिकन तेल आणि वायू कंपन्यांनी माघार घेतल्यानंतर रशियाने भारताला आपल्या तेल आणि संसाधनांनी समृद्ध सखालिन बेटाचा वापर करण्याची ऑफर दिली. भारत लवकरच जगातील सर्वात श्रीमंत तेलक्षेत्रांपैकी एक शोधू शकतो.
रशिया – युक्रेन युद्धातून राजनैतिक वाटाघाटींद्वारेच मार्ग काढावा; पंतप्रधान मोदींची झेलेन्सकीना सूचना; युक्रेनला मानवीय मदतीचीही ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी हरदीप सिंह पुरी यांना पेट्रोलियम मंत्री केले हे मोदींचे मोठे धोरणात्मक पाऊल ठरले. कारण हरदीप सिंह पुरी भारताच्या परराष्ट्र सेवेतून राजदूत पदाची सेवा बजावलेले महत्त्वाचे राजनैतिक अधिकारी आहेत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एक्सपर्ट आहेत भारत – रशिया टेल संबंध याविषयी त्यांचे फार सखोल काम आहे.
भारत आता अभिमानाने O&G चा संशोधक होऊ शकतो. भविष्यात भारताची भूमिका जागतिक पातळीवर निव्वळ तेल आणि गॅस आयातकर्ता राहणार नाही तर तो निर्यातदारही ठरू शकतो. जगाला इंधन विकू शकतो. भारत रशियन तेल आणि वायूवर नियंत्रण ठेवण्यासह, ToT सह US MIC शस्त्रे खरेदी करत आहे. हे भू-राजकीय हितसंबंधांचे परिपूर्ण संतुलन आहे. मग हार्वर्ड मधले कितीही एक्सपर्ट अर्थशास्त्रज्ञ डॉ. जयशंकर यांना “वेटर” आणि मोदींना राजकारण आणि अर्थशास्त्रात “निरक्षर” म्हणोत, भारताची भविष्यातली दमदार वाटचाल त्यांना रोखता येणे शक्य नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App