दगडफेकीमध्ये डीएसपीसह चार पोलीस जखमी
विशेष प्रतिनिधी
जुनागढ : गुजरातमधील जुनागढमध्ये शुक्रवारी रात्री बेकायदेशीर दर्ग्यावरून मोठा हिंसाचार झाला. दर्ग्याच्या बेकायदा बांधकामाबाबत प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर लोक संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवरच निशाणा साधला. यादरम्यान माजेवाडी चौकात असलेल्या पोलिस चौकीवर हल्लेखोरांच्या जमावाने तोडफोड करून वाहने पेटवून दिली. एवढेच नाही तर पोलिस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. Gujarat Violence over Illegal Dargah Removal Notice
संध्याकाळी सात वाजल्यापासून लोक जमू लागले आणि नऊ वाजेपर्यंत 200-300 लोक दर्ग्याभोवती जमले. पोलिसांनी त्यांना या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडफेक सुरू केली आणि पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक डेप्युटी एसपी आणि तीन पोलीस जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस संपूर्ण शहरात कसून तपास करत आहेत.
खरे तर जुनागडमधील माजेवाडी गेटसमोर रस्त्याच्या मधोमध एक दर्गा बांधण्यात आला आहे. तो हटवण्यासाठी महापालिकेच्या वतीने वरिष्ठ नगररचनाकारांनी नोटीस बजावली होती. हे धार्मिक स्थळ बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे नोटीसमध्ये लिहिले होते. पाच दिवसांच्या आत या धार्मिक स्थळाच्या कायदेशीर वैधतेचे पुरावे सादर करावेत, अन्यथा हे धार्मिक स्थळ पाडण्यात येईल आणि त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. धार्मिक स्थळ (दर्गा) पाडण्याची नोटीस लावण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले होते. नोटीस वाचताच समाजकंटक जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ते हल्ला केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App