मोहन भागवतांच्या वक्तव्यावर नबाब मलिक – असदुद्दीन ओवैसींच्या परस्पर विरोधी प्रतिक्रिया


वृत्तसंस्था

मुंबई – हैदराबाद – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात Mob lynching आणि हिंदू – मुस्लीमांसह सर्व भारतीयांच्या DNA संदर्भात केलेल्या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. RSS Chief on DNA; sharp reactions on mohan bhagwat`s statement by nawab malik and Asaduddin Owaisi

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी खोचकपणे डॉ. मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, की मोहन भागवत म्हणाले आहेत, की सर्व भारतीयांचा DNA एक आहे. तर त्याचे स्वागत आहे. मोहन भागवतांचे हृदय बदलले असेल, अर्थात त्यांचे विचार बदलले असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवणारी संघटना जर आपले विचार बदलत असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करतो, असे वक्तव्य नबाब मलिक यांनी केले आहे. यात त्यांनी संघाला वर्णव्यवस्था मानणारी संघटना अशा शब्दांमध्ये टोचूनही घेतले आहे.

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र, नेहमीप्रमाणे गोडसे – आरएसएस – मुसलमानांचे शिरकाण वगैरे शब्द वापरून डॉ. भागवतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. तशी एकापाठोपाठ ट्विट त्यांनी केली आहेत. अखलाख, पहेलू, अलीमुद्दीन यांची नावेच पुरेशी आहेत. त्यांच्या हिंदुत्ववाद्यांनी हत्या केल्यात. त्यांना गाय – म्हशीतला फरकर कळत नाही. डरपोक, हिंसाचार आणि गोडसेचे हिंदुत्व हे त्यांच्याही हिंदुत्वाचे अभिन्न अंग आहे. अशा शब्दांमध्ये ओवैसी यांनी डॉ. मोहन भागवतांच्या वक्तव्यावर तोंडसुख घेतले आहे.

RSS Chief on DNA; sharp reactions on mohan bhagwat`s statement by nawab malik and Asaduddin Owaisi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*