वृत्तसंस्था
चेन्नई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेकजण योगदान देत आहे. क्रिकेटरपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वजचण आर्थिक मदत देत आहेत. त्यामध्ये, बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत.Rs 50 lakh from Rajinikanth for fight against Corona; Check given to CM
आता, दक्षिणेचा महानायक रजनीकांतनेही कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी आर्थिक योगदान दिलं आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांची भेट घेतली व त्यांच्याकडेच 50 लाखांची मदत चेक स्वरुपात दिली.
कोरोनाविरुद्धची लढाई आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन कराव. तरच, आपण कोरोनाला रोखता येईल, असे रजनीकांतने म्हटले. रजनीकांतने 50 लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे सुपूर्द केला.
रजनीकांतसह अनेक सेलिब्रिटींनी आणि क्रिकेटर्संनेही मदत निधी दिला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीही 5 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचं लक्ष्य ठेवलं होत, जे काही दिवसांतच त्यांनी पूर्ण केलं. तआणखी मोठा निधी उभारण्यात आला आहे.
रजनीकांतने घेतला लसीचा दुसरा डोस
कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत यांनीही काही दिवसांपूर्वीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांची मुलगी सौंदर्या हिने ट्विटरवरुन माहिती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App