विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनच्या कच्छपि लागलेल्या श्रीलंकेमध्ये गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मानवातावादी भूमिकेतून भारताने श्रीलंकेला ७५ हजार मेट्रिक टनांहून अधिक पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात आला आहे. आतापर्यंत भारताने २.७० लाख मेट्रिक टन इंधन श्रीलंकेला दिले आहे. इंधनाशिवाय जीवनावश्यक औषधी व वैद्यकीय मदतही भारताने पुरविली आहे. सर्व काह चीनला विकल्याचा आरोप येथील जनता राष्ट्रपतींवर करत आहे.Resupply of 75,000 metric tons of fuel from India to Shrilanka on humanitarian ground, also aid for essential medicines
श्रीलंकेत चीनने प्रचंड गुंतवणूक केली होती. मात्र, श्रीलंका त्याची परतफेड करू शकतला नाही. त्यामुळे श्रीलंकेत आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यानंतर प्रचंड इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताने प्राधान्याने इंधनपुरवठा केला आहे. ३६ हजार मेट्रिक टन पेट्रोल आणि ४० हजार मेट्रिक टन डिझेलचा पुरवठा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ४० हजार मेट्रिक टन डिझेल पुरविण्यात आले होते.
श्रीलंकेत आणीबाणी उठविण्यात आली असली तरीही औषधांबाबत मात्र गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे भारताने क्रेडिट लाईनअंतर्गत आवश्यक औषधांचा पुरवठा केला आहे. भारताने संकटकाळात केलेल्या मदतीसाठी श्रीलंकन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आणीबाणी उठविल्यानंतर हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. सरकारने सर्वकाही चीनला विकल्यामुळेच सरकारकडे पैसा नसल्याचा आरोप जनतेने केला आहे.
अमेरिकेने आपल्या नागरिकांना श्रीलंकेत प्रवास करण्याबाबत लेव्हल-३चा अलर्ट जारी केला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग, इंधन आणि औषधांचा तुटवडा तसेच दहशतवादी हल्ल्याचीही शक्यता पाहता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना सावधतेच्या सूचना दिल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App