विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (DCGI) कोरोनावर उपचार म्हणून आणखी एका औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलायड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युअर बायोलॉजीने (CCMB) संयुक्तपणे बनवले आहे. या औषधाचे नाव 2-deoxy-D-glucose (2-DG) असे ठेवण्यात आले आहे. हे औषध तयार करण्याची जबाबदारी हैदराबादमधील डॉ. रेड्डी लॅबोरेट्रीजला देण्यात आली आहे.
#WATCH: Dr Anant Narayan Bhatt & Dr Sudhir Chandna, Institute of Nuclear Medicine & Allied Sciences(INMAS-DRDO) scientists speak about drug 2-deoxy-D-glucose (2-DG). DCGI approved emergency use of its therapeutic application as adjunct therapy in moderate to severe COVID patients pic.twitter.com/pySgG2moQC — ANI (@ANI) May 8, 2021
#WATCH: Dr Anant Narayan Bhatt & Dr Sudhir Chandna, Institute of Nuclear Medicine & Allied Sciences(INMAS-DRDO) scientists speak about drug 2-deoxy-D-glucose (2-DG). DCGI approved emergency use of its therapeutic application as adjunct therapy in moderate to severe COVID patients pic.twitter.com/pySgG2moQC
— ANI (@ANI) May 8, 2021
DRDO च्या एका औषधाला तातडीच्या वापराची मंजुरी देण्यात आली आहे. DCGI म्हणजेच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने DRDO ला ही संमती दिली आहे.
2Deoxy D Glucose च्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. ज्या रूग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात आली त्यांच्या आरोग्यात तातडीने सुधारणा झाल्याचंही दिसून आलं आहे. एवढंच नाही कोरोना झाल्यानंतर ज्या रूग्णांना ऑक्सिजन कमी पडत होता अशा रूग्णांना हे औषध देण्यात आलं तेव्हा त्यांची ऑक्सिजनची गरजही कमी झाली. असाही दावा करण्यात आला आहे की या औषधामुळे कोरोना रूग्णाचा रिपोर्ट इतर रूग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह येतो. डिआरडीओचे वैज्ञानिक एप्रिल 2020 मध्ये या औषधावर संशोधन करत होते. मे 2020 मध्ये या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी मंजुरी देण्यात आली होती.
क्लिनिकल ट्रायल्स-
देशभरातल्या विविध रूग्णालयांमधे हे औषध पाठवण्यात आलं होतं. ट्रायल बीचा दुसरा टप्पा हा सहा रूग्णालयांमध्ये तर ट्रायल टू बीचा टप्पा हा 11 रूग्णालयांमध्ये पाठवण्यात आला होता. 110 रूग्णांना हे औषध देण्यात आलं. ट्रायलमध्ये जे रूग्ण सहभागी झाले होते ते इतर रूग्णांपेक्षा सुमारे तीन दिवस आधी बरे झाले .
फेज थ्री
डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत देशभरातल्या 27 रूग्णालयांमध्ये हे औषध पाठवण्यात आलं होतं. यावेळी 220 रूग्णांना हे औषध दिलं गेलं. फेज थ्रीमधली चाचणी ही दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधील रूग्णालयांमध्ये असलेल्या रूग्णांवर करण्यात आली.
ज्या रूग्णांना 2Deoxy D Glucose हे औषध देण्यात आलं होतं. त्यापैकी सुमारे 42 टक्के रूग्णांना ऑक्सिजनची भासणारी कमतरता ही तिसऱ्या दिवशी संपली. हा ट्रेंड 65 वर्षे आणि त्यावरील रूग्णांमध्ये पाहण्यास मिळाला हे विशेष आहे.
2Deoxy D Glucose हे औषध पावडरच्या स्वरूपात आहे. हे औषध पाण्यात मिसळून घ्यायचं आहे. शरीरातले व्हायरस आणि त्यांची वाढ रोखण्याचं काम हे औषध करतं. सध्या देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे कारण कोरोनाचा फैलावही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अशात ऑक्सिजनची कमतरताही रूग्णांना भासते आहे. आता नवं आलेलं हे औषध 2Deoxy D Glucose हे रूग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं यात काही शंका नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App