कोरोनामुक्त झाल्यावर आहाराची पंचसूत्री; रोगप्रतिकार शक्ती वाढेल, प्रकृतीही सुधारेल झपाट्याने

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनातून मुक्त झाला. अरे व्वा ! चांगलीच आणि आनंदाची बातमी आहे. पण, त्यानंतर सुद्धा तुम्हाला आरोग्याची काळजी ही घेतली पाहिजे. कोरोना झाल्यानंतर आणि कोरोनामुक्त झाल्यावर आरोग्याची विशेषतः आहार कसा असावा याचे उत्तर आमच्याकडे आहे. आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी या आहाराची माहिती दिली.Wondering what to eat while recovering from Covid?

 

आहाराची पंचसूत्री

केवळ पाच प्रकारचा आहार आहे. त्यातून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि कोरोनातून मुक्त आल्यावर प्रकृतीही झपाट्याने सुधारणार आहे.

1) सकाळी उठल्यावर रात्री पाण्यात भिजवून ठेवलेले बदाम आणि बेदाणे खा. बदाममध्ये प्रथिनांचा (प्रोटीन) मोठा खजिना असून बेदाण्यात लोहाचे (आयर्न) प्रमाण मोठे असते.

2) न्याहरीमध्ये नाचणीचा डोसा किंवा वाटीभर खीर खावी

3) सकाळच्या जेवणाच्या अगोदर किंवा जेवणात गूळ आणि तूप एकत्र करून पोळीबरोबर खावे

4) रात्रीच्या जेवणात खिचडी खावी. ती पोषक तत्वांनी युक्त असल्याने पौष्टिक असते. पचायला हलकी असल्याने रात्री झोप शांत येण्यास मदत मिळते.

5) पाणी पिण्याची हयगय करू नये. शरीर पाण्याने परिपूर्ण राहील, याची खात्री करावी. तसेच दैनंदिन जीवनशैलीत लिंबाचे सरबत, ताक याचा समावेश प्रामुख्याने करावा.