Reliance Future Deal : रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमधील बहुचर्चित कराराविरोधात अॅमेझॉनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अॅमेझॉनच्या बाजूने निकाल दिला आहे. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपचा सुमारे 24 हजार कोटींचा करार आता स्थगित करण्यात आला आहे. Reliance Future Deal supreme court Verdict amazon
विशेष प्रतिनिधी
मुंबई : रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमधील बहुचर्चित कराराविरोधात अॅमेझॉनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अॅमेझॉनच्या बाजूने निकाल दिला आहे. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपचा सुमारे 24 हजार कोटींचा करार आता स्थगित करण्यात आला आहे.
सिंगापूरमधील आणीबाणी लवादाचा निर्णय भारतातही लागू होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. रिलायन्स-फ्युचर ग्रुपच्या निर्णयाला सिंगापूरमध्ये स्थगिती देण्यात आली होती, त्यानंतर अॅमेझॉनने भारतात विलीनीकरण कराराविरोधात याचिकाही दाखल केली होती.
रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या सुमारे 24 हजार कोटींच्या कराराच्या विरोधात अॅमेझॉनने प्रथम दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, उच्च न्यायालयाने या कराराला स्थगिती देण्यास नकार दिला. यानंतर अॅमेझॉनच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली.
देशाच्या विविध भागांमध्ये लोकप्रिय असलेला बिग बाजार हा फ्युचर ग्रुपचा भाग आहे. काही काळापूर्वी रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमध्ये किरकोळ बाजाराबाबत सर्वात मोठा करार झाला होता आणि 24,713 कोटींच्या करारानंतर रिलायन्सला फ्युचर ग्रुपची मालकी मिळाली.
अमेझॉनने या कराराला विरोध केला होता, कारण अमेझॉनची फ्युचर ग्रुपच्या कंपनीमध्ये 49 टक्के हिस्सेदारी होती. करारानुसार, जर कंपनी विकली गेली, तर अॅमेझॉनला खरेदीचा पहिला अधिकार असेल; पण रिलायन्स-फ्युचर ग्रुप डीलमध्ये याचे पालन झाले नाही.
अॅमेझॉनने प्रथम सिंगापूर न्यायालयात याविषयी अपील केले होते, जिथे निर्णय अमेझॉनच्या बाजूने आला. त्यानंतर हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले, ज्यामध्ये उच्च न्यायालयाने हा करार पुढे जाऊ शकतो असे सांगितले होते. पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली आहे.
Reliance Future Deal supreme court Verdict amazon
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App