सौदी अरेबियातील रियाध येथून भारतात सोन्याची तस्करी करण्याचा कट रचल्याबद्दल NIAकडून गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केलेल्या सोने तस्करास CBIने सौदी अरेबियातून पकडून भारतात आणले आहे. सीबीआय आणि एनआयएच्या मदतीने, इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसचा सामना करणार्या एका कथित तस्कराला सौदी अरेबियातून भारतात परत आणण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. Red Corner Notice issued by Interpol CBI nabs Gold Smuggler from Saudi
सीबीआयने एक निवेदन जारी केले आहे, की सीबीआयच्या ग्लोबल ऑपरेशन सेंटरने इंटरपोलच्या मदतीने मोहब्बत अलीला भारतात आणण्यासाठी एनआयएशी समन्वय साधला आहे. मोहब्बत अलीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्याला 17 ऑगस्ट रोजी सौदी अरेबियातून भारतात आणण्यात आले. एनआयएने रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली होती.
एनआयएच्या विनंतीवरून 13 सप्टेंबर 2021 रोजी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सौदी अरेबियातील रियाध येथून भारतात सोन्याची तस्करी करण्याचा कट रचल्याबद्दल अलीविरुद्ध एनआयएने गुन्हा दाखल केला असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. आरोपी मोहब्बत अली हा सोन्याच्या तस्करीच्या गुन्ह्यात वाँटेड होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App