59 वर्षे नेहरू मेमोरियल हेच ठेवले नाव; पण आता नामांतर झाल्यानंतर राहुल गांधींना नेहरूंचे आठवले काम!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांचे निवासस्थान असणारे तीन मूर्ती भवन याचे रूपांतर 17 नोव्हेंबर 1964 रोजी नेहरू मेमोरियल मध्ये करण्यात आले. ते केंद्र सरकारने नेहरूंना समर्पित केले. तब्बल 59 वर्षे तिथल्या सरकारी संग्रहालयाचे नाव नेहरू मेमोरियल लायब्ररी असेच राहिले. पण आता 59 वर्षांनंतर केंद्रातल्या मोदी सरकारने त्याचे नामांतर करून “प्रधानमंत्री संग्रहालय” असे नवे नामकरण केले. त्यानंतर पंडित नेहरूंचे पणतू राहुल गांधींना नेहरूंचे “नाव” नव्हे, तर “काम” महत्त्वाचे आहे असे वाटले आहे!! After the name change, Rahul Gandhi remembered Nehru’s work

केंद्र सरकारने 14 ऑगस्ट रोजी दिल्लीतील नेहरू मेमोरियलचे नाव बदलून पंतप्रधान मेमोरियल असे केले. त्यावर तीन दिवसांनंतर म्हणजे गुरुवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नेहरूंचे नाव नव्हे, त्यांचे काम महत्त्वाचे आहे आणि त्यांचे काम हीच त्यांची खरी ओळख आहे नाव नव्हे, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल यांच्या या वक्तव्याबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, आम्ही सर्व माजी पंतप्रधानांना आदर देत आहोत, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. काँग्रेस पक्ष विनाकारण याचा मुद्दा बनवत आहे. यात काय अडचण आहे मला माहिती नाही, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी नेहरू मेमोरियल म्युझियमचे पीएम म्युझियम अँड लायब्ररी (PMML) असे नामकरण करण्यात आले. यावर्षी 15 जून रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्राच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते- ज्यांचा स्वतःचा इतिहास नाही, ते इतरांचा इतिहास पुसून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. स्मारकाचे नाव बदलण्याचा प्रयत्न आधुनिक भारताचे शिल्पकार आणि लोकशाहीचे निर्भिड संरक्षक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाला कमी लेखू शकत नाही. यावरून भाजप-आरएसएसची हुकूमशाही वृत्ती दिसून येते.

प्रधानमंत्री संग्रहालय

21 एप्रिल 2022 रोजी त्याच परिसरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते पंतप्रधानांना समर्पित संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये देशातील सर्व पंतप्रधानांची माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी या संकुलात भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित संग्रहालय उभारण्याची कल्पना मांडली होती. काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी कॉम्प्लेक्समध्ये पंतप्रधान मेमोरियल बांधण्यात आले. 21 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हाही काँग्रेसने विरोध केला होता.

पंडित नेहरूंचे अधिकृत निवासस्थान

एडविन लुटियन्सच्या इंपीरियल कॅपिटलचा भाग म्हणून 1929-30 मध्ये बांधलेले, तीन मूर्ती हाऊस हे भारतातील कमांडर-इन-चीफचे अधिकृत निवासस्थान होते. ऑगस्ट 1948 मध्ये ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान बनले. 27 मे 1964 रोजी नेहरूंचे निधन झाले. पंडित नेहरूंचे इथे 16 वर्षे वास्तव्य होते.

1964 मध्ये बांधले नेहरू संग्रहालय

नेहरूंच्या निधनानंतर तत्कालीन सरकारने तीन मूर्ती हाऊस जवाहरलाल नेहरूंना समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यात संग्रहालय आणि ग्रंथालय बांधण्याचा प्रस्ताव तत्कालीन सरकारने मांडला.

14 नोव्हेंबर 1964 रोजी नेहरूंच्या 75 व्या जयंतीदिनी तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांनी तीन मूर्ती भवन राष्ट्राला समर्पित केले आणि नेहरू मेमोरियल म्युझियमचे उद्घाटन केले. दोन वर्षांनंतर, संस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी NMML सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून ती तशीच आहे.

पीएम मोदी सोसायटीचे अध्यक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे अध्यक्ष आहेत. याच्या 29 सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, जी किशन रेड्डी, अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे.

1948 मध्ये हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान बनले. पंडित नेहरूंच्या 75 व्या जयंती 14 नोव्हेंबर रोजी त्याचे स्मारक करण्यात आले.

After the name change, Rahul Gandhi remembered Nehru’s work

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात