Record Break Corona Cases : कोरोना महामारीच्या तीव्र उद्रेकामुळे अवघा देश पुन्हा एकदा भयंकराच्या दारात उभा आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. मागच्या 24 तासांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने मागचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. विविध राज्य शासनांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गतदिवशी एकूण तब्बल 1.31 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना महामारीच्या सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा आकडा आहे. Record Break Corona Cases 1.31 lakh patients across the country in 24 hours
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या तीव्र उद्रेकामुळे अवघा देश पुन्हा एकदा भयंकराच्या दारात उभा आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. मागच्या 24 तासांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने मागचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. विविध राज्य शासनांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गतदिवशी एकूण तब्बल 1.31 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना महामारीच्या सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा आकडा आहे.
गेल्या 24 तासांत 1.34 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 800 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे, 24 तासांत देशभरात 60 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांपर्यंत वेगाने वाढत आहे, सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा 9.74 लाखांवर पोहोचला आहे.
या आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास सोमवारपासून देशभरात 5 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवार : 1.03 लाख रुग्ण, मंगळवार : 96 हजार रुग्ण, बुधवार : 1.15 लाख रुग्ण, गुरुवार : 1.26 लाख रुग्ण, शुक्रवार : 1.31 लाख रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ही संपूर्ण देशातील रुग्णसंख्येच्या तुलनेत धडकी भरवणारी आहे. सलग दहा दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 56 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. यातील 9 हजार रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. याखेरीज यापूर्वी दिल्लीत साडेसात हजार रुग्ण आढळले असून मागच्या मार्च महिन्याच्या तुलनेत ही आकडेवारी कितीतरी जास्त आहे.
दिल्ली-महाराष्ट्राशिवाय कोरोनाने आता उत्तर प्रदेशातही भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. मागच्या 24 तासांत उत्तर प्रदेशात 8 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून हा तेथील सर्वात मोठा आकडा आहे. अनेक राज्यांत आधीच रेकॉर्ड ब्रेक होत असल्याने संपूर्ण देशासाठी ही चिंतेची बाब बनली आहे.
कोरोना साथीच्या वाढत्या उद्रेकादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. पंतप्रधान मोदींनी येथे असे सूचित केले आहे की, देशभरात लॉकडाऊन लादले जाणार नाही, परंतु रात्रीचे कर्फ्यू लादणारे राज्य योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकते. त्याला कोरोना कर्फ्यू म्हणायला हवे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. तसेच पीएम मोदी यांनी चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे, यामध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या 70 टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगितले गेले आहे.
Record Break Corona Cases 1.31 lakh patients across the country in 24 hours
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App