रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना अटक ; मुंबई, नांदेडला पोलिसांचे छापे


वृत्तसंस्था

मुंबई : रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर पोलिसांनी मुंबई आणि नांदेडमध्ये छापे टाकून पाच जणांना अटक केली आहे. Maharashtra police busts remdesivir black marketing racket

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचं समोर आलं आहे. गरज असल्याने नागरिक हव्या त्या किमतीत इंजेक्शन विकले जात आहे. मात्र, काहीजण कृत्रिम तुटवडा निर्माण करुन चढ्या दराने विक्री करत आहेत. अशाच प्रकारे रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.



मुंबईत एकाला अटक, औषधांचा साठा जप्त

मुंबई क्राईम ब्रान्चच्या पथकाने मुंबईतील जोगेश्वरी भागात रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी 12 रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केले. या व्यक्तीचे आणखी काही सहकारी असल्याचा संशय असून पोलिस कसून चौकशी करत आहेत. तसेच या आरोपीकडे इंजेक्शनचा साठा असल्याचा संशयही पोलिसांना आहे.

नांदेडमध्येही टोळीला अटक

नांदेडमध्ये रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून रेमडिसिवीर ब्लॅकमध्ये विकणाऱ्या चौघांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांकडून पोलिसांनी सात इंजेक्शनही जप्त केले. पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली.

मूळ किंमत कमी असतांना रेमडिसिवीर इंजेक्शन आठ हजार रुपयांना विकले जात होते. पथकाने वीरभद्र स्वामी, बाबा पडोळे, बालाजी धोंडे आणि विश्वजित कांबळे या चौघांना ताब्यात घेतले. हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव आणि मनस्वी ऐजेसी संजीवनी हॉस्पिटल येथून हे चार आरोपी इंजेक्शन मिळवायचे आणि काळ्या बाजारात विक्री करायचे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात मोठी साखळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Maharashtra police busts remdesivir black marketing racket

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात